Main Featured

Reliance Jioचा सर्वात स्वस्त प्लॅन


plans-of-reliance-jio-The-cheapest

plans of reliance jio
 
रिलायन्स जिओने reliance jio काही वर्षांपूर्वी स्वस्त मोबाइल डेटा प्लॅन लाँच करून दूरसंचार उद्योगात धमाका केला होता. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडून वाढती स्पर्धा लक्षात घेता जिओनं डेटा प्लॅन बदलले आहेत. जेव्हा किफायतशीर प्रीपेड रिचार्ज प्लॅनचा विचार केला जाईल, तेव्हा Jio सर्वात पुढे असेल. जिओकडे रिचार्ज पॅक देखील आहे, ज्याची किंमत 1 जीबी डेटासाठी फक्त 3.5 रुपये आहे. चला जाणून घेऊयात जिओच्या 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल...

599 रुपयांचा जिओ प्लॅन
जिओचा हा प्लॅन बराच लोकप्रिय आहे. 599 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय-स्पीड Hi-speed डेटा ऑफर केला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 168 जीबी डेटा उपलब्ध आहे. दररोज डेटा संपल्यानंतर वापरकर्ता 64 केबीपीएस गतीने इंटरनेटचा फायदा मिळू शकतो. म्हणजेच 1 जीबी डेटासाठी वापरकर्त्यांना 599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये केवळ 3.57 रुपये खर्च करावे लागतील.
यासंदर्भात हा प्लॅन कंपनीच्या 249 आणि 444 रुपयांच्या प्लॅनपेक्षा स्वस्त आहे. 444 रुपयांच्या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे आणि यात एकूण 112 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच 1 जीबी डेटाची किंमत 4 रुपये आहे. रिलायन्स जिओच्या 599 रुपयांचे प्रीपेड पॅक जिओ-टू-जिओ अमर्यादित कॉलिंगची सुविधा देते, तर इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 3000 मिनिटे मिळतात. या पॅकमध्ये आपल्याला दररोज 100 विनामूल्य एसएमएस पाठवता येतात. याशिवाय जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही विनामूल्य आहे.

एअरटेलबद्दल सांगायचे झाल्यास एअरटेलचा 598 रुपयांचा प्लॅन आहे. या पॅकची वैधता 84 दिवसांची आहे आणि यात दररोज 1.5 जीबी डेटासह एकूण 126 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच 1 जीबी डेटाची किंमत 4.75 रुपये आहे. त्याचबरोबर 599 रुपयांच्या व्होडाफोन-आयडिया प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे आणि त्यात दररोज एकूण 1.5 जीबी डेटा मिळतो. व्होडाफोनच्या एका पॅकमध्ये 1 जीबी डेटाची किंमत 4.75 रुपये आहे.