Main Featured

petrol rate today- जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा भाव

petrol rate today



petrol rate today- गेल्या आठवड्यात तीन दिवस दर कपातीला विश्रांती दिल्यानंतर कंपन्यांनी देशभरात डिझेल दर कपातीचे सत्र सुरु ठेवले होते. त्याला आज ब्रेक लागला. आज कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनाच्या किमती जैसे थे ठेवल्या आहेत. मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७७.०४ रुपये प्रती लीटर कायम आहे.

दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव (petrol rate today)८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.६३ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७६.१० रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७४.१५ रुपये प्रती लीटर आहे. गेल्या सात दिवसांमध्ये सलग पाच दिवस डिझेल स्वस्त झाले होते.

Must Read

1) रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद
2) SBI-ICICI सह आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा

3) रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा

4) दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा
5) टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो

गेल्या आठवड्यात तीन दिवस दर कपातीला विश्रांती दिल्यानंतर कंपन्यांनी देशभरात डिझेल दरात कपात केली होती. त्या आधीच्या आठवड्यात कंपन्यांनी डिझेल दर कमी केले होते. मुंबईत ३ सप्टेंबर रोजी पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.७३ रुपये कायम आहे. 

डिझेलचा(diesel)भाव ७९.९४ रुपये झाला आहे. त्याआधी २ सप्टेंबर रोजी डिझेलचा भाव ८०.११ रुपयांवर होता. आज डिझेलचा भाव प्रती लीटर ७७.०४ रुपये इतका खाली आला आहे. दर कपातीने डिझेल महिनाभरात सरासरी ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे.दरम्यान, अनलॉकनंतर देशातील इंधन मागणी वाढली असल्याचे सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दिसून आले आहे. पेट्रोलची विक्रीचे प्रमाण करोना पूर्व स्थितीला गेले आहे. १ ते १५ सप्टेंबर या या काळात पेट्रोल विक्रीत २.२ टक्के वाढ झाली.

डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.८७ टक्क्यांनी घसरले आणि ४०.६ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. अमेरिकेचे खासदार आणि व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांदरम्यान झालेल्या नव्या प्रोत्साहनपर मदतीच्या आशेने क्रूडला आधार दिला. मात्र साथीच्या विस्तारत जाणाऱ्या परिणामामुळे क्रूडच्या मागणीत सातत्याने घट होत आहे. 

कोव्हिड-१९ (covid-19)च्या नव्याने आलेल्या लाटेमुळे जागतिक तेल बाजार घटला. तसेच विविध अर्थव्यवस्थांमध्ये पुन्हा लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चिंता वाढल्या. परिणामी क्रूडच्या अर्थकारणावरही परिणाम झाला. पेट्रोलियम निर्यात संघटना (ओपेक)ने उत्पादनात कपात करूनही, लिबिया आणि इराणने तेल निर्यात वाढवली आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर आणखी खालावले. कमकुवत अर्थव्यवस्थेमुळेदेखील तेलाच्या दरांवर आणखी नकारात्मक परिणाम झाले.