Main Featured

कोल्हापूरात रुग्ण वाढणार, तयारी ठेवा

Kolhapur corona patients increase


Kolhapur- माझे कुटुंब - माझी जबाबदारी सर्वेक्षणामुळे कोरोना रुग्णांची संख्या अचानक १० ते १५ टक्क्यांनी वाढणार आहे. असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही; यामुळे घरात बसलेल्या रुग्णांवर ते गंभीर स्थितीला जाण्याआधीच त्यांच्यावर उपचार होतील व परिणामी मृत्युदर व कोरोना संसर्गाचा (corona)वाढता वेग कमी करता येईल. त्यामुळे रुग्णांसाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन(oxygen), आयसीयूचे(ICU) अधिकाधिक बेड मिळतील, डॉक्टरांसह औषधांची उपलब्धता यांचे सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.


सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक बी. सी. केम्पीपाटील, ह्यसीपीआरह्णच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर सौरभ राव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


Must Read


सौरभ राव म्हणाले, सर्वेक्षणामुळे रुग्णसंख्येत १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून सर्वसाधारण, ऑक्सिजन (oxygen), आयसीयू (ICU)अशा प्रत्येक विभागांतील १० ते १५ टक्के या प्रमाणात बेड वाढवावे लागणार आहेत. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये साडेतीन हजार बेड आहेत. याशिवाय अतिरिक्त बेडची तयारी, जेवण, स्वच्छता, ऑक्सिजन ही सगळी यंत्रणा उभारावी लागणार आहे.

कोरोनाबाबतीत जिल्ह्याची स्थिती सध्या चिंता वाढविणारी आहे. येथील स्थिती मुंबई, पुण्यासारखी झाली असून, हा विषाणू संसर्गाचा टप्पा आहे. एका स्थितीपर्यंत गेल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत जाते. महापालिका क्षेत्रातील रुग्णवाढीचा दर आता कमी झाला आहे.

बाधित तालुक्यांतील रुग्णसंख्या कमी होत असून नवीन तालुक्यांत प्रमाण वाढत आहे. प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचणे, त्यांना गरजेनुसार बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन कमी पडणार नाही याची दक्षता, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता हे सगळे खूप आव्हानात्मक आहे.

महात्मा फुले योजनेत सध्या जिल्ह्यातील ५२ हॉस्पिटल असून त्यात आणखी हॉस्पिटलचा समावेश व्हावा यासाठी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्याशी चर्चा करून हा विषय मार्गी लावू.