Main Featured

जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्यास रिक्षा संघटनांचा नकार


                             auto rikshw

कोरोनाची वाढती साखळी पुन्हा तोडण्यासाठी कोल्हापुरातील व्यापारी, व्यावसायिकांतर्फे ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. त्यात कोल्हापुरातील विविध रिक्षा संघटनांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे. यासंबंधी बुधवारी सकाळी निवृत्ती चौकातील ब्रह्मेश्वर मंदिरात झालेल्या सर्व रिक्षा संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विविध तालुक्यांमध्ये जनता कर्फ्यू पुकारला जात आहे. त्यातून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. त्याकरिता कोल्हापूर शहरामध्येही शुक्रवारी (दि. ११) ते बुधवारी (दि. १६) पर्यंत सहा दिवसांचा कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजतर्फे व्यापारी व उद्योजकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या कर्फ्यूमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा एक भाग असणाऱ्या रिक्षाचालकांनी व त्यांच्या संघटनांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे

Must Read

कारण व्यवसायाच्या अनिश्चिततेमुळे आर्थिक नुकसान होत आहे. सरकारनेही रिक्षाचालकांना कोणतीच मदत केली नाही; त्यामुळे सहभागी होणार नसल्याची माहिती सर्व रिक्षाचालक संघटनांतर्फे, महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेतर्फे राजेंद्र जाधव यांनी दिली. या बैठकीत महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, महाराष्ट्र वाहतूक संघटना, भाजप रिक्षाचालक संघटना, ताराराणी रिक्षाचालक संघटना, स्वाभिमानी रिक्षाचालक संघटना, कॉमन मॅन रिक्षा संघटना, आदर्श रिक्षाचालक संघटना, आदींतर्फे चंद्रकांत भोसले, शंकरलाल पंडित, मधुकर दिंडे, अविनाश दिंडे, अरुण घोरपडे, इर्श्वर चणी, वसंत पाटील, मानसिंग भालकर, बबन कापूसकर, आदी सहभागी झाले होते.