Main Featured

एक कोटींहून अधिक मजुरांनी केले पलायन


one crore labor migrantn lock down

लॉकडाऊनच्या काळात एक कोटींहून अधिक मजुरांनी आपल्या घरी पलायन केले. त्याची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. सर्वाधिक मजूर हे उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहार (Biharचे असल्याचे समोर आले आहे.(More than one crore workers flee) या आकडेवारीमुळे उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यात किती बेरोजगारी आहे हे स्पष्ट होत आहे.

कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळात 1 कोटी 4 लाख 66 हजार 152 मजुरांनी पलायन करून आपले घर गाठले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार 4 हजार 611 श्रमिक रेल्वेच्य माध्यमातून 63 लाख 7 हजार प्रवाशांना आपल्या घरी सोडण्यात आले. याचा अर्थ 41 लाख प्रवासी मजुरांनी पायी अथवा इतर साधनांनी आपले घर गाठले आहे. असे असले तरी या दरम्यान किती मजुरांचा मृत्यू झाला याची आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नाही.

Must Read


सर्वाधिक मजुर हे उत्तर प्रदेश आणि बिहारचे रहिवासी आहेत. त्यामुळे या राज्यात बेरोजगारीचे प्रमाण किती कमी आहे हे निदर्शनास आले आहे. सर्वाधिक मजूर उत्तर प्रदेशमध्ये परतले आहेत. त्यांची संख्या 32 लाख 49 हजार 638 इतकी आहे. तर बिहारमधून 15 लाख 612 मजूर बिहारमध्ये परतले आहेत. बिहारमधील सर्वाधिक मजूर हे मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरांत (More than one crore workers flee)उदरनिर्वासाठी स्थलांतरित झाले होते.

पश्चिम बंगालमध्ये 13 लाख 84 हजार 693 मजूर परतले आहेत. तर राजस्थानमध्ये 13 लाख 8 हजार 130 मजूर परतले आहेत. तर मध्यप्रदेशमध्ये 7 लाख 53 हजार 581 मजूर परतले आहेत.