Main Featured

कायमची मुंबई सोडून देईन, कंगनाचं गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान


                                        kangana & anil deshmukh

indian politics and bollywood : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतचा काही संबंध आहे का याची माहिती मुंबई पोलीस घेणार असल्याचं सांगितलं आहे. विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी (Kangana challenges Home Minister Anil Deshmukh)ही माहिती दिली. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर कंगना रणौतने ट्विट केलं असून आपली ड्रग्ज टेस्ट करण्याचं आवाहन दिलं आहे. तसंच पुरावा सापडल्यास आपण आपली चूक मान्य करु असंही ती म्हणाली आहे.

हे वाचून तर बघा....

कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय”.

अनिल देशमुख यांनी काय म्हटलं आहे?
अनिल देशमुख यांनी (Kangana challenges Home Minister Anil Deshmukh)प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे  की, “आमदार सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी दाखल केलेल्या विनंतीवर विधानसभेत उत्तर देताना मी सांगितलं की, कंगना राणौत आणि अध्ययन सुमन यांच्यात संबंध होते. अध्ययन सुमनने एका मुलाखतीत indian politics and bollywood कंगना ड्रग्ज घेत असून आपल्यावरही जबरदस्ती केली होती असं सांगितलं होतं. मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक माहिती घेत आहेत”.