Main Featured

सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’

Whether Report

Whether Report- पावसाने थोडी कुठे उघडीप घेतली तोच मुंबईत (Mumbai) वाढत्या तापमानाने डोके वर काढले आहे. शुक्रवारसोबत शनिवारीदेखील मुंबईकरांना ऊन्हाचे वाढीव चटके बसले असले असून, पुढील दोन ते तीन दिवस ‘ताप’ दायक वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामानात अचानक झालेल्या या बदलामुळे मुंबईकरांना सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटचा तडाखा बसू लागला असून, मुंबईकरांच्या शरीराहून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. राज्यासह मुंबईत धो धो कोसळलेला मान्सून आता ब-यापैकी विश्रांतीवर आहे. राज्यात अद्यापही ठिकाणी मान्सून कोसळत असून, मुंबईत मात्र त्याने ब-यापैकी विश्रांती घेतली आहे.


Must Read
विशेषत: शुक्रवारीच मुंबईकरांना चढत्या पा-याचा किंचित अनुभव आला होता. शनिवारी त्यात आणखी भर पडली; आणि हवामान खात्यानेदेखील तापमानात वाढ (Whether Report) नोंदविली. विशेषत: शनिवारी सकाळी अकरा वाजल्यापासून मुंबईकरांना ऊन्हाचे चटके बसू लागले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तर अक्षरश: शरीराहून घामाच्या धारा वाहू लागल्या. ऊनं आणि ऊकाड्याने मुंबईकरांना घाम फोडला. 

दुपारी बारा वाजता पडलेले रखरखीत ऊनं दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत कायम होते. एक तर कोरोना आणि त्यात हा ऊकाडा अशा दुहेरी वातावरणाने मुंबईला शनिवारी कोंडीत पकडले होते. दुपारदरम्यान मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले ऊनं अक्षरश: पोळत होते. अशा रखरखीत ऊन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मुंबईकरांनी छत्रीचा वापर केला होता. तर बाजारपेठांमध्ये देखील भाजी विक्रेत्यांनी पावसाळ्यात वापरात येणारी छत्री ऊन्हापासून बचाव व्हावा म्हणून वापरल्याचे चित्र होते.