Consolation to the townspeople as there is a big drop in the number of patients

इचलकरंजी येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट होत असल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला. मात्र मंगळवारी संख्येमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. तर एका महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार विविध 13 भागात 18 रूग्ण मिळून आले आहेत. तर विकासनगर परिसरातील महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. आज अखेर शहरातील रूग्णांची संख्या 3788 झाली आहे. 3414 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या 188 जणांवर उपचार सुरू आहेत.

Advertise

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

आज अखेर 186 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात हत्तीचौक  परिसरात 3, राजराजेश्‍वरी नगर, भोनेमाळ, शाहू कॉर्नर आदी भागात प्रत्येकी 3 रूग्ण आढळून आलेे. तर शांतीनगर, सुर्वोदयनगर, मंगलमूर्ती टॉकीज परिसर, दुर्गामाता मंदिर परिसर, मंगळवारपेठ, गणेशनगर, रिंगरोड बह्माकुमारी परिसर, मुक्त सैनिक वसाहत, जवाहरनगर आदी भागात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला.