Main Featured

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येला उतार

corona positive cases in sangli

Sangli जिल्ह्यात मंगळवारी 573 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह (corona positive)आल्या. गेल्या नऊ दिवसांतील आकडेवारी पाहता कोरोना रुग्णसंख्येला उतार लागला आहे.718 व्यक्ती ऑक्सिजनवर, 97 व्यक्ती नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर(ventilator)आहेत.मंगळवारी जिल्ह्यातील 20 आणि परजिल्ह्यातील 3 अशा एकूण 23 व्यक्तींचा मृत्यू झाला.


उपचाराखालील 871 व्यक्ती अतिदक्षता विभागात आहेत. मंगळवारी 439 जण कोरोनामुक्त झाले. भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

जिल्ह्यात मंगळवारअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 18 हजार 281 झाली आहे. मंगळवारअखेर 9 हजार 917 व्यक्ती कोरोनामुक्त  झाल्या आहेत. सध्या 7 हजार 661 व्यक्ती उपचाराखाली आहेत.

त्यापैकी 871 व्यक्तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील 718 व्यक्ती ऑक्सिजनवर, 97 व्यक्ती नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर, 49 व्यक्ती हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर (oxygen)आणि 7 व्यक्ती इन्व्हेजीव व्हेंटीलेटरवर (ventilator)आहेत. उपचाराखालील 5 हजार 84 व्यक्ती होम आयसोलेशन आहेत.


Must Read


1)कोल्हापूरमध्ये जंम्बो कोविड सेंटरची मागणी

2) कोल्‍हापूर पोलिस भारी केली दंडाची कारवाई

3) आयजीएम रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी लक्ष देणं गरजेचं 4) शहरातील हॉटेल व्यवसायिकांवर पोलिसांची कारवाई 5) कशासाठी, बायकोसाठी ... हौस पूर्ण करण्यासाठी त्याने चोऱल्या दुचाकी