Main Featured

आता इचलकरंजी मध्ये रंगणार अनोखी स्पर्धा

ichalkaranji


Ichalkaranji- शासन, सामाजिक संस्था अनेकजण मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीवर भर देताना दिसत आहेत. हजारोंच्या संख्येत झाडे लावली (tree for plantation)जातात. मात्र या झाडांच्या जगण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे इचलकरंजीत झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याच्या दृष्टीने लायन्स क्‍लबने विधायक पॅटर्न राबवला आहे. शाळांना प्रोत्साहित करून झाडे जगवण्याची अनोखी वृक्षारोपण स्पर्धा शहरात सुरू केली आहे. सुमारे 13 शाळा या स्पर्धेत सहभाग घेऊन पर्यावरण बचावासाठी पुढे आल्या आहेत.


लायन्स ब्लड बॅंक दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम राबवत असते. मात्र यावेळी वृक्षारोपण करून त्यांचे उत्तम संगोपन करण्याचा हेतू क्‍लब सदस्यांच्या विचारधीन आला. विद्यार्थ्यांवर शालेय वयात पायाभूत शिक्षणाबरोबर वृक्षलागवडीचे संस्कार होतील आणि हीच मुले पर्यावरणासाठी चांगुलपणाची चळवळ राबवतील, या उद्देशाने वृक्षारोपण स्पर्धा सुरू केली.


Must Readशहरातील शाळांना प्रोत्साहित करून क्‍लबच्या वतीने प्रत्येकी दहा झाडांचे वितरण (tree for plantation) करण्यात येत आहे. प्रामुख्याने सर्वच दहा झाडे कडूलिंबाची दिली आहेत. कडूलिंब हे औषधी व 100 टक्के ऑक्‍सिजन देणारे झाड आहे. त्यामुळे या झाडाचा समावेश वृक्षारोपण स्पर्धेत केला आहे.

स्पर्धेत सहभागी शाळांना ही झाडे त्यांच्या शाळेच्या प्रांगणात लावून योग्य प्रकारे संगोपन करायचे आहे. पुढील वर्षी जूनमध्ये या झाडांचे परीक्षण करण्यात येणार आहे. ज्या शाळांनी झाडे अतिशय योग्यरित्या वाढवली आहेत व संगोपन केली आहेत, अशा प्रथम तीन शाळांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. सध्या वृक्षारोपण स्पर्धेला शाळांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

वृक्षलागवड चळवळीला व्यापक व विधायक ग्रुप लायन्स क्‍लबने वृक्षारोपण स्पर्धेच्या माध्यमातून दिले आहे. स्पर्धेमुळे शालेय वयात मुलांना अभ्यासाबरोबर वृक्षारोपणाची गोडी निर्माण होणार आहे. झाडे लावा, झाडे जगवा हे घोषवाक्‍य वृक्षारोपण स्पर्धेमुळे मुलांच्या मनावर मजबूतपणे कोरले जाणार आहे.

वृक्षारोपण (tree for plantation)स्पर्धेत सहभागी शाळा


सरस्वती हायस्कूल, इचलकरंजी हायस्कूल, भारती हायस्कूल, अशोका हायस्कूल, हिरा राम गर्ल्स हायस्कूल, शहापूर हायस्कूल, रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन, तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, मणेरे हायस्कूल, मथुरा हायस्कूल, हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर, दि न्यू ज्युनिअर कॉलेज, रामभाऊ जगताप हायस्कूल.

प्रदूषण टाळण्यासाठी मदत


शालेय जीवनातच वृक्षारोपणाचा संस्कार मुलांमध्ये रुजला जाणार आहे. वृक्षारोपण स्पर्धेसाठी स्वयंस्फूर्तीने शाळा पुढे येत आहेत. यामुळे शहरातील वाढते प्रदूषण टाळण्यासाठी नक्कीच मदत होईल.