Main Featured

आता NCBच्या निशाण्यावर करण जोहर

Karan Johar

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कलाविश्वातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांत आत्महत्ये प्रकरणी आता पर्यंत अनेक जणांची चौकशी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घराणेशाही, गटबाजी या गोष्टींसाठी चर्चेत असणारा दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar)देखील आता एनसीबीच्या रडारवर आहे. 


सुशांत आत्महत्या प्रकरणाची तपासणी करणारी एनसीबी यंत्रणा सध्या ड्रग्स ऍगलवर (Drugs)चौकशी करत आहे. त्यामुळे ३० जुलै २०१९ रोजी करण जोहरच्या घरी झालेल्या पर्टीची चौकशी एनसीबी करणार असल्याची शक्यता आहे. 

Must Read

३० जुलै २०१९ रोजी करणच्या  घरी एक पार्टी झाली होती. या पार्टीमध्ये विकी कौशल, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, रणबीर कपूर अर्जुन कपूर, वरुण धवन, अयान मुखर्जी, झोया अख्तर यांसारखे कलाकार उपस्थित होते.  या पार्टीचा व्हिडिओ टिक-टॉकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. 
दरम्यान, शुक्रवारी एनसीबीने ड्रग्ससंदर्भात मोठा खुलासा केला. १५ बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्स  (Drugs)प्रकरणी एनसीबीच्या रडारवर असल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्वांची नावं अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीनंतर समोर आली आहेत.