Main Featured

मोदींच्या वाढदिवशीच ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ ट्रेण्डमध्ये

PM narednra modi


आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM narednra modi)70वा वाढदिवस आहे. या वर्षी मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे.



70 ठीकाणी 70 कार्यक्रम करण्याचा निश्चय भाजपाने केला आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं.

Must Read


मोदींचा वाढदिवस सुरु झाल्यानंतर रात्री बारानंतर काही तासांमध्ये #राष्ट्रीयबेरोजगारीदिवस तसेच #NationalUnemploymentDay हे हॅशटॅग भारतामध्ये ट्रेण्ड होऊ लागला आहे.या दोन्ही हॅशटॅगवर 10 लाखांहून अधिक ट्विट करण्यात आलेत.

 दाढीऐवजी रोजगार वाढवण्याचा तरुणांचा खोचक सल्ला


मोदी सरकारने दिलेली आश्वासनांची आठवण करुन देत अनेकांनी #राष्ट्रीयबेरोजगारीदिवस हा हॅशटॅग वापरुन मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

 भाषण नको रोजगार द्या, दाढी नाही रोजगार वाढवा, ते दोन कोटी रोजगार कुठे गेले ज्याबद्दल तुम्ही आश्वासन दिलेलं असे अनेक मुद्दे सोशल मीडियावर मांडण्यात आले आहेत.

एकीकडे #राष्ट्रीयबेरोजगारीदिवस ट्रेण्ड होत असतानाच दुसरीकडे #HappyBirthdayPMModi हा हॅशटॅगही ट्रेण्ड होताना दिसत आहे. त्याचबरोबरच Modi ji, #NarendraModiBirthday,#NationalUnemploymentDay या हॅशटॅगचीही चर्चा आहे.