Main Featured

बॉयफ्रेन्डसोबत रोमॅन्टिक झाली नर्गिस फाखरी, पाहा फोटोइम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी बॉलिवूडची हॉटी नर्गिस फाखरी सध्या रिलेशनशिपमुळे (relationship)चर्चेत आहे. नर्गिसचा ‘रॉकस्टार’ हा पहिलाच सिनेमा हिट झाला. या चित्रपटातील तिची  व रणबीर कपूरची जोडीही हिट झाली. मात्र नर्गिस बॉलिवूडमध्ये फार चमक दाखवू शकली नाही. चित्रपटांपेक्षा अफेअरमुळेच ती चर्चेत राहिली. सध्या नर्गिस (nargis fakhri) जस्टिन संटोसला डेट करतेय.
नर्गिस व जस्टिनचे रोमॅन्टिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द जस्टिनने हे फोटो शेअर केले आहेत. ‘ही परफेक्ट महिला बघा. मी इतका नशीबवान कसा? सुंदर असण्यासोबतच ती मजेदार जोक्स ऐकवते, असे मी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवाल?’, अशा कॅप्शनसह जस्टिनने नर्गिससोबतचे (relationship) हे फोटो शेअर केले आहेत.यात जस्टिन व नर्गिस दोघेही एका क्रूजवर आहेत. नर्गिसचा बॉयफ्रेन्ड जस्टिन हा एक शेफ आहे. नर्गिस कॅलिफोर्नियाला राहते तर जस्टिन न्यूयॉर्कचा राहणारा आहे. असे असले तरी एकमेकांना भेटायला ते वेळ काढतातच.जस्टिनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ नर्गिस नेहमी सोशल मीडियावर करत असते. सध्या हे कपल व्हॅकेशनवर आहे. याच दरम्यान जस्टिन नर्गिसला शूटिंग रेंजवर गनशूट शिकवतो आहे. अलीकडेच नर्गिसने (nargis fakhri) व्हॅकेशन दरम्यानचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. ज्यात ती जस्टिनसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसली होती.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, नर्गिस ‘तोरबाज’मध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत संजय दत्त, राजू चड्ढा, पुनीत सिंग आणि अन्य कलाकार दिसणार आहेत. नर्गिस शेवटची ‘अमावस’मध्ये दिसली होती, हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही.