Main Featured

Birthday Special : पंतप्रधान मोदींच्या जीवनातील 'त्या' कधीही न ऐकलेल्या गोष्टी


narendra-modi-Unheard-things-in-life
narendra modi
 
पंतप्रधान मोदींच्या जीवनातील 'त्या' कधीही न ऐकलेल्या गोष्टी असा कोणता स्वातंत्र्यसैनिक होता ज्याच्या अस्थि घेण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी narendra modi स्वित्झर्लंडला गेले होते, तेसुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ५६ वर्षांनी. इतकंच नव्हे, तर त्यांच्या स्मरणार्थ मोदींनी त्यांच्याच गावात एका इमारतीचं बांधकामही करवून घेतलं. त्या स्वातंत्र्य सैनिकाचं नाव आहे, श्यामजी कृष्ण वर्मा. 

परदेशी धरतीवर भारतीय क्रांतीकारकांचे मार्गदर्शक आणि कायम त्यांच्या मदतीला येणारे वर्मा. असं म्हटलं जातं की, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी १९०७ मध्ये सावरकरांना इंडिया हाऊसची जबाबदारी दिली आणि ते पॅरिसला निघून गेले. पहिल्या महायुद्धामध्ये फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये मैत्री झाल्यानंतर ते पत्नी भानुमतीसह स्वित्झर्लंडला निघून आले.  जिथं त्यांनी 'सेंट जॉर्ज सीमेट्री' या अस्थि पेढीमध्ये फी देऊन आपल्या आणि पत्नीच्या अस्थिंचं जतन करण्याची विनंती केली. स्वातंत्र्यानंतर कोणी देसभक्त येऊन या अस्थि आपल्या मायदेशी नेईल असा त्यांचा विश्वास होता. पण, स्वातंत्र्यानंतर बऱ्याच सत्ताधाऱ्यांचा याचा विसर पडला. अखेर २२ ऑगस्ट २००३ ला स्वातंत्र्याच्या ५६ वर्षांनंतर मोदींनी त्या दोघांच्याही अस्थि भारतात आणल्या. त्यावेळी ते गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी होते. 

 

पुढं मांडवी येथे इंडिया हाऊस प्रमाणंच एक इमारत उभारण्यात आली. जिला, 'क्रांती तीर्थ' असं नाव देण्यात आलं. असं म्हटलं जातं की, पंतप्रधानांचा दाढीतील लूक यहा श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यापासूनच प्रेरित आहे. 

काबुलच्या संसदेत ज्या जाट राजानं दिग्गज भाजप नेता अटल बिहारी वायपेयी यांना हरवलं होतं त्यांची मोदी प्रशंसा करतात. लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणाऱ्या या राजाचं नाव, राजा महेंद्र प्रताप. ते उत्तर प्रदेशमधील हाथरसच्या मुरसान येथील मूळ रहिवासी होते. या राजाला ओळखलं जातं कारण त्यांनी पहिल्यांदाच देशातील अनिवासी सरकारची घोषणा केली होती. अफगाणिस्तानातील काबुल येथे हे सरकार उदयास आलं होतं. संपूर्ण कॅबिनेटसह तयार करण्यात आलेल्या या मंत्रीमंडळामध्ये राष्ट्रपती पद या राजाकडे होतं. 

  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे कायमच राजकीय दृष्टीकोनातून पाहिलं जातं. पण, समाजकार्याच्या बाबतीतही संघाची कामगिरी तितकीच वाखाणण्याजोगी आहे. सेवा भरती या संघाच्याच अनोख्या उपक्रमामध्ये मोदींचं योगदान मोलाचं आहे. नावाप्रमाणेच या माध्यमातून गरजूंची शक्य त्या सर्व परिंनी सेवा करण्यात येते. 

ज्या काळात गुरु गोलवलकर संघाच्या सरसंघचालक पदी होते, तेव्हा १९६४ मध्ये विश्व हिंदू परिषद सुरु केली जाणार होती. त्यावेळी संघाच्या बड्या सदस्यांनी पुढाकार घेतला. पुढं १९७२ मध्ये विश्व हिंदू परिषदेचं एक मोठं संमेलन गुजरातच्या सिद्धपूर येथे होणार असल्याचं निर्धारित झालं. या संमेलनाच्या आयोजनामध्ये मोदींची महत्त्वाची भूमिका होती. या निमित्तानं नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच संघातील मोठ्या सदस्यांच्या नजरेत कायमचं स्थान निर्माण करुन गेले. 

आणिबणीच्या काळातही मोदी बरेच सक्रीय होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला शीख रुपातील त्यांचा फोटो तुम्ही पाहिला असेल. आणिबाणीच्या काळात संघ, जनता पक्ष आणि इतर अपक्षांमध्ये सुसूत्रता राखत एक समिती तयार करण्यात आली होती. त्यावेळी मोदी गुजरातच्या सचिवपदी होते. सुरक्षित स्थळं शोधून दिल्लीहून येणाऱ्या मोठ्या नेत्यांना तिथं थांबवणं, कारागृहा असणाऱ्या संघाच्या नेत्यांच्या- कार्यकर्त्यांच्या परिजनांना आर्थिक मदत आणि दिलासा देणं अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. या परिस्थितीमध्ये स्वत:ला अटक होऊ नये आणि आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यात खंड पडू नये यासाठी मोदींनी हे रुप धारण केलं होतं.