Main Featured

हत्ती गवत कापण्याच्या वादातून तरुणाचा निर्घृण खुन


 

                                  The brutal murder of a young man


गवत कापण्याच्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. गुरुवारी घडलेल्या घटनेतील खूनी हल्ला करणारा संशयित किरण हिंदूराव पाटील (रा. कुरुकली, ता. करवीर) हा स्वत:हून इस्पुर्ली पोलिस ठाण्यात हजर झाला. संशयित किरण आणि मयत काशिनाथ यांच्यात हत्ती गवत वैरण कापण्यावरुन वाद झाल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. (Brutal murder of a young man)दोघेही कुरुकली गावचे रहिवाशी आहेत. 

गणेश चतुर्थीच्या दिवशी काशिनाथ याच्या कुटूंबातील जनावरे चुकून किरण याच्या शेतात गेली होती, त्यावेळी त्यांनी त्यांचे हत्ती गवत खाल्ले होते. त्यामुळे कुटूंबात वाद झाला होता. यावेळी झालेल्या भांडणावेळी मृत काशिनाथ याने किरणची गळपट्टी धरल्याचे समजते. त्याचा राग मनात धरून किरणने काशिनाथचा खून केल्याची माहिती मिळत आहे.


आज सकाळी कौलव ता. राधानगरी येथिल आजोबांचे अंत्यसंस्कार करून काशिनाथ नुकताच परत गावी आला होता. त्यानंतर तो शेताकडे फेरी मारण्यासाठी दुचाकीवरुन जात असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. आधीचा राग मनात ठेवून किरणने मोटारसायकलवरुन पाठी मागून येऊन ऊसतोड करण्यासाठी वापरणाऱ्या कोयत्याने मानेवर सपासप वार करुन काशिनाथचा खून केला.


घटनास्थळावरील दृश्य थरकाप उडवणारे होते. मयत काशिनाथ यांच्या मानेवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वर्मी घाव बसल्याने त्याचा मृतदेह(Brutal murder of a young man) रक्ताने माखला होता, सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. घटनास्थळी करवीर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, हवालदार के.डी. माने यांच्यासह पोलिस तात्काळ दाखल होवुन पुढील तपास सुरु आहे.