Main Featured

IPL 2020- मुंबई इंडियन्सचा ‘प्लॅन’ तयार

Mumabi Indians


IPL 2020- मुंबई इंडियन्सच्या (Mumabi Indians)संघाला सोमवारी विराटच्या बंगळुरू संघाविरोधात हार पत्करावी लागली. अतिशय अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. इशान किशनने ९९ धावांची अफलातून खेळी केली पण त्या खेळीचा मुंबईला विजयासाठी फायदा करून घेता आला नाही.


आता मुंबईचा (Mumabi Indians) पुढील सामना गुरूवारी पंजाब संघाशी आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत झळकावलेली शतकं ही पंजाबचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्या नावावर आहेत. त्यामुळे पंजाबशी दोन हात करताना या दोन फलंदाजांना लवकर बाद करण्यासाठीचा ‘प्लॅन’ मुंबईकडे तयार असल्याची माहिती गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डने दिली आहे.

“राहुल आणि मयंक सध्या दमदार लयीत आहेत. राहुलने आमच्याविरूद्ध आधीच्या हंगामातही धावा केलेल्या आहेत. तो खेळपट्टीवर स्थिरावला की खूप फटकेबाजी करू शकतो हे आम्हाला माहिती आहे. तो फलंदाजी करताना खेळपट्टी समजून घ्यायला थोडा वेळ घेतो. आणि ८ ते १४ या षटकांच्या कालावधीत थोडासा संयमाने खेळतो.

त्यामुळे ते दोघे जर तितका वेळ खेळपट्टीवर टिकले, तर आम्ही त्यांच्यावर जमेल तेवढा दबाव आणण्याचा प्रयत्न करू. काहीही करून त्यांना धावा करून देणार नाही, हा आमचा ‘प्लॅन’ आहे”, असं शेन बॉन्ड म्हणाला.

मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही येथील वातावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत आहे. दुबई किंवा अबुधाबीत जुने विक्रम काय सांगतात हे सध्या महत्त्वाचं नसून लवकरात लवकर वातावरणाशी दोस्ती करणं आवश्यक आहे”, असेही बॉन्डने सांगितलं.