sambhaji rajeस्वराज्याची राजधानी अशी जगभरात ओळख असलेल्या किल्ले रायगडवर (raigad) उभारण्यात आलेली 'रोप वे' आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ही सेवा बेकायदा (illegal)असून रोप वे व्यवस्थापनाने खासगी जागेत अतिक्रमण करून रोप वे उभारला असल्याची धक्कादायक बाब रायगड जिल्हा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी उघडकीस आणली आहे. याबाबत खासदार संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी या संदर्भात मंगळवारी रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला. किल्ले रायगडवर सुरूवातीपासून स्थानिक असलेल्या अवकिरकर या कुटुंबांच्या जागेत दिशाभूल (illegal)करून रोप वे उभारण्यात आला आहे. 

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

गेली 30 वर्षांत रोप वे व्यवस्थापनाने रायगड किल्ला संवर्धनात कसलाही सहभाग घेतलेला नाही. याउलट कायम असहकार्य राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्र सरकारकडे प्राधिकरणाने तक्रार केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने किल्ले रायगड वरील रोप वे सेवा ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण स्थगित केल्यामुळे मराठा समाज पुन्हा नाराज झाला आहे. मराठा आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसत आहे. त्यात मराठाविरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांनी खासदार छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेतली. आपण सर्व जण एक कुटुंब आहोत. सर्वांनी मराठा आरक्षणाला सहकार्य करावे, असे संभाजी राजे यांनी मत व्यक्त केलं.

ओबीसी समाजाच्या ज्या चिंता आहेत. त्या ऐकून घेण्याची विनंती हरिभाऊ राठोड यांनी केली. संपूर्ण ओबीसी समाज मराठा समाजसोबत सहकार्याची भावना घेऊन मदत करेल असाही शब्द त्यांनी दिला. त्यांच्या सोबत मुस्लिम, ओबीसी समाजाचे अध्यक्ष युनूस मणियार हे सुद्धा होते. बाराबलुतेदार संघटना आणि कुंभार समाजाचे नेते सुद्धा उपस्थित होते.