Main Featured

कोल्हापुरात आता थुंकणाऱ्यांची खैर नाही...!


Kolhapur शहर आणि ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोराना वाढीचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या थुंकण्याविरोधात (spitting case)शहरामध्ये एक मोठी चळवळ उभी राहत आहे. महाराष्ट्र शासनाच्या एडस्‌ नियंत्रण विभागाच्या कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी पुढाकार घेतला आहे. या चळवळीत शहरासह आता जिल्ह्यातील नागरिक सहभागी होत आहेत.


शहरात थुंकण्याविरोधात चळवळ सुरू केली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचे संकट आणि त्यातच शहरात तसेच ग्रामीण भागातही सार्वजनिक ठिकाणी तसेच गाडीवररून प्रवास करताना थुंकण्याचे प्रकार घडत आहेत. याला विरोध करण्यासाठी शिपूरकर यांनी रस्त्यातच थुंकणाऱ्याला अडवून जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यातील एका युवकास शिक्षाही झाली.

Must Read


थुंकण्याऱ्याच्या विरोधात सोशल मीडियावर (Social media)जनमत तयार झाले. त्याला चळवळीचे स्वरुप येत आहे.रस्त्यात थुंकल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याच बरोबर टिबीचाही प्रसार होवू शकतो. याचे गांभीर्य नागरिकांना अजूनही नसल्याचे दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा गुन्हा आहे, हेच अनेक नागरिकांना माहीत नाही, न थुंकण्याचा सल्ला दिला तर वादावादीचे प्रसंग अनेकदा घडतात. परंतु सामाजिक आरोग्य धोक्‍यात घालणाऱ्या या व्यक्तींना या चळवळीमुळे लगाम बसणार आहे.

थुंकल्यास दंड (spitting case)


रस्त्यावर थुंकल्यास कायद्यात शिक्षेची विविध किमान सात कलमे आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना पोलिसांना आढळल्यास दंड करण्याचा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आदेश काढला आहे.