Main Featured

येथे थुंकू नये अन्यथा व्हाल व्हायरल


                                     spitting

रोगराई पसरण्यासाठी थुंकण्यामुळे बळ मिळते; म्हणूनच या थुंकण्याविरोधात शहरामध्ये चळवळ उभी करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या एड‌्स नियंत्रण विभागाच्या सीपीआर रुग्णालयातील कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. यासाठी अनेकजण आता पुढे येत असून लवकरच कृती कार्यक्रमही जाहीर करण्यात येणार आहे.


शिपूरकर यांनी(Anti-spit movement continues in the city) गेल्या दोन महिन्यांपासून थुंकण्याविरोधात वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. थुंकीतून कोरोनाचा प्रसार होत असल्याने रस्त्यावर थुंकणाऱ्यांना त्यांनी जागेवरच जाब विचारण्यास सुरुवात केली होती. त्यांचे फोटोही समाजमाध्यमावर त्यांनी प्रसारित केले होते. यातूनच त्यांना  थुंकण्याविरोधी चळवळ ही कल्पना सुचली.

Must Readयासाठी त्यांनी व्हॉट‌्स ॲप ग्रुप तयार केला असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्यामध्ये यासाठी आता कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. या अंतर्गत गुटखाविक्रीची माहिती देणे, रस्त्यांवर थुंकणाऱ्यांचे फोटो काढून ते प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे, शहरातील सीसीटीव्हींचा वापर करून थुंकणाऱ्यांना नोटिसा काढण्याबाबत आग्रह धरणे, मास्क नसल्याने जसा दंड होतो तसा थुंकल्याबद्दल दंड करणे, हॉटस्पॉटवर जास्त लक्ष केंद्रित करणे, शहरातील होर्डिंगवरून जनजागरण करणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.