Main Featured

दोघांच्या विरोधात सावकारीचा गुन्हा दाखल





 इचलकरंजी येथे व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम परत करूनही गहाण ठेवलेले 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने, कोरे धनादेश आणि मुद्रांक परत दिला नाही तसंच जादा व्याजाची मागणी करत धमकी दिल्याप्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी पोलिसांनी सराफ व्यावसायीक शहाजी खोत (Filed a money laundering case)याला अटक केली असून त्याला न्यायालयानं 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

MUST READ 

1) एटीएममधून १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढताय? लागू होणार ‘हा’ नवा नियम


2) सुरेश रैनाच्या काका आणि चुलत भावांचे मारेकरी सापडले


3) आधी माझी तपासणी करा सांगत तरुण तरुणीची दादागिरी, रुग्णांचे स्वॅब फेकून दिले


4) PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, या 5 चुका केल्यास काढता येणार नाही खात्यातील रक्कम


5) The best student laptops 2020

इचलकरंजीनजीक यड्राव इथं राहणारे पवन पाटील यांनी डेक्कन मिलसमोरील शहाजी पांडुरंग खोत आणि वैशाली शहाजी खोत यांच्या अमोल ज्वेलर्स या सराफ व्यवसायीकाकडून 2017 मध्ये 65 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यापोटी सोन्याच्या 4 अंगठ्या, कर्णफुले, बे्रसलेट असे 4 तोळेे दागिने, 2 कोरे धनादेश आणि 100 रुपयांचा मुद्रांकही दिला होता. कर्जाची परतफेड केल्यानं गहाण ठेवलेले दागिने, धनादेश आणि मुद्रांकाची वारंवार मागणी करूनही दिले नाही. उलट जादा व्याजाची मागणी (Filed a money laundering case)करून सदर मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची धमकी दिली. त्यामुळं संगनमतानं फसवणुक केल्याप्रकरणी पवन पाटील यांच्या फिर्यादीनुसार शहाजी आणि वैशाली खोत यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी शहाजी याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.