social media viral post


पंतप्रधान योजनांच्या नावाखाली अनेक फसवणूक करणाऱ्या घटना समोर येत आहेत. काही बनावट योजना दाखवून सामान्यांची फसवणूक (fraud case)केली जाते आहे. लॉकडाऊन काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सामान्य जनतेला फसवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर या भामट्यांकडून केला जात आहे. दरम्यान यामध्ये सोशल मीडियाचा (social media)वापर केला जात आहे. अनेकांचा सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास बसतो. परिणामी लोकांना नुकसान सहन करावे लागत आहे.


सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, सरकारकडून 'पंतप्रधान बालिका अनुदान योजने'अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी 50000 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे.


Must Read

1) रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद
2) SBI-ICICI सह आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा

3) रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा

4) दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा
5) टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो

व्हायरल होणारी ही पोस्ट पूर्णपणे बनावट आहे. केंद्र सरकारद्वारे अशी कोणतीच योजना राबवली जात नाही आहे. भारत सरकारच्या प्रेस इन्फरमेशन ब्यूरोने (PIB) व्हायरल होणाऱ्या या पोस्टची सत्यता नाकारली आहे, त्यांनी असे म्हटले आहे की सरकारची अशी कोणतीही योजना नाही आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने त्यांच्या ट्विटर हँडलवर (social media) असे लिहिले आहे की, 'एका वेबसाइटवर असा दावा केला जात आहे केंद्रसरकार 'दावा- पंतप्रधान बालिका योजने'अंतर्गंत बीपीएल श्रेणीतील कुटुंबांना मुलींच्या लग्नासाठी 50000 रुपयांची मदत करणार आहे. PIBFactCheck- हा दावा खोटा आहे. केंद्र सरकार अशी कोणतीही योजना राबवत नाही आहे.'

या वेबसाइटवर असे लिहिले आहे की, बालिका योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तर्फे दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबातील मुलींना लाभ व्हावा याकरता करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत देशातील बीपीएल श्रेणीच्या कुटुंबांना जास्तीत जास्त दोन मुलींच्या लग्नासाछी 50000 रुपयांची मदत मिळेल. सरकारकडून ही मदत देऊ केली जाईल. त्याचप्रमाणे या श्रेणीतील कुटुंबांमधील विधवा महिलांच्या दोन मुलींसाठी एकरकमी 50000 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाईल.