Main Featured

महाराष्ट्रात COVID-19 टेस्टचे दर घटले


                                          minnesota coronavirus-covid-19 test
minnesota coronavirus 
महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात जनतेसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे सरकारने राज्यात कोरोना टेस्टचे (corona test) दर आणखी कमी केले आहे. कोरोना चाचणीसाठी आता फक्त 1200 रुपये द्यावे लागतील.

राज्य सरकारने कोव्हिड चाचणीचे  सुधारित दर जाहीर केले आहेत. यासंदर्भात शासकीय आदेश काढला आहे. त्यानुसार आता कोरोना चाचणीचे दर फक्त 2000 रुपयांपर्यंतच ठेवण्यात आले आहे. राज्यात दुसऱ्यांदा कोरोना टेस्टची किंमत कमी करण्यात आली आहे. आता कोरोना चाचणी केंद्रावर, कोव्हिड सेंटर किंवा रुग्णालयात कोरोनाची चाचणी झाल्यास फक्त 1200 ते 1600 रुपये मोजावे लागतील. तर घरी टेस्ट झाल्यास 2000 रुपये द्यावे लागतील.

सुरुवातीला कोरोना minnesota coronavirus  चाचणीसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जायचे. अगदी सुरुवातीला खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा PPE moth वापर यामुळे 5200 रुपये आकारले जात होते. नंतर त्यावर सरकारने नियंत्रण आणलं. राज्य सरकारने हे दर कमी केले आणि 4500 रुपयांऐवजी जास्तीत जास्त 2200 रुपये आणि घरी जाऊन केलेल्या चाचणीसाठी 2800 रुपये आकारण्यात आले.

दरम्यान आता हे दर आणखी कमी झाले आहेत. चाचणीच्या किमती कमी झाल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना चाचणीचे दर सर्वात कमी असल्याचं म्हटलं जातं आहे.