Main Featured

मराठा आरक्षणाला स्थगिती : मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक


                       maratha aarkshan stop 

 मराठा आरक्षणा (Maratha reservation) ची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग करताना २०२० - २१ या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या असून यासंदर्भातच सरकारची पुढील भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज महत्त्वाची बैठक बोलवली आहे. 

हे वाचा
5) जमिनीवर पाठ टेकून झोपण्याचे 8 फायदे 

दरम्यान, मराठा आरक्षण स्थगितीसाठी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी जबाबदार आहेत. महाधिवक्ता कुंभकोणी एकाही सुनावणीला हजर राहिले नाही, असा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्य (Important meeting convened by CM)सरकारी वकील अॅडव्होकेट निशांत कातनेश्वर यांनी केला आहे. पूर्वी मराठा आरक्षण केस लढवलेल्या वकिलांशीही महाधिवक्त्यांनी चर्चा केली नसल्याची टीका, कातनेश्वर यांनी केली.