Main Featured

वरना जवानी निकल जाएगी...!

मलायका अरोरा (malaika arora) नुकतीच कोरोना पॉझिटीव्ह आढळली. मलायकाने स्वत: तिचा कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.मला कोरोनाची लागण झाली असून प्रोटोकॉलअंतर्गत मी सेल्फ आयसोलेशनमध्ये असल्याचे मलायकाने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते. आता मलायकाने इन्स्टावर एक स्टोरी शेअर केली आहे. सेल्फ आयसोलेशन आणि कोरोनामुळे मलायका वैतागली असल्याचे या स्टोरीवरून दिसतेय.‘कोई व्हॅक्सिन निकाल दो भाई, वरना जवानी निकल जाएगी...,’ अशा आशयाची मजेशीर इन्स्टास्टोरी (Instagram) मलायकाने (malaika arora) शेअर केली आहे. ही पोस्ट मलायकाने गमतीत लिहिली असली तरी सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणे तिला जरा जड जातेय, हेच यावरून दिसतेय.

Must Read
मलायकाचा कोरोना रिपोर्ट झाला होता लीक

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली़ पाठोपाठ मलायका अरोरा हिचा रिपोर्टही पॉझिटीव्ह असल्याची बातमी आली होती. आधी मलायकाची बहीण अमृता अरोरा हिने मलायका पॉझिटीव्ह आल्याची बातमी शेअर केली. यानंतर खुद्द मलायकानेही पोस्ट शेअर करण, तिला कोरोनाची लागण झाल्याची बातमी शेअर केली होती. 
यानंतर अचानक व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मलायकाचा मेडिकल रिपोर्ट व्हायरल झाला होता. लोकांनी धडाधड हा रिपोर्ट एकमेकांना फॉरवर्ड करणे सुरु केले होते. काही लोक तर यावरून मलायकाची खिल्ली उडवतानाही दिसले होते.
मलायकाचा मेडिकल रिपोर्ट व्हायरल झालेला पाहून आणि यावरून लोक मलायकाची मजा घेत असल्याचे पाहून तिची बहीण अमृता अरोरा जाम भडकली होती. मलायकाचा मेडिकल रिपोर्ट पोस्ट करण्याचा काय अर्थ? ती एक जबाबदार नागरिक आहे. 
त्यामुळे ती स्वत:हून तिचा रिपोर्ट जगजाहिर करणार नाही. पण मला कळत नाहीये की, तिचा रिपोर्ट डिस्कस करण्यात कसला आनंद आहे? तिला कोराना कसा व कधी झाला, यावर चर्चा करण्यात काय अर्थ आहे? काही जणांनी लॉफिंग इमोजीसह तिचा मेडिकल रिपोर्ट शेअर केला आहे़ ती डिजर्व्ह करते, अशा कमेंटही लिहिल्या आहेत. पण का? अशा शब्दांत अमृताने तिला संताप व्यक्त केला होता.

अर्जुन कपूरलाही कोरोना

मलायकाचा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर हाही कोरोना पॉझिटीव्ह (corona positive) आला आहे. त्याने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली होती.