Main Featured

आजपासून Flipkart Wholesale Sale , जाणून घ्या काय आहे खास?

Flipkart Wholesale


Flipkart Wholesale ने सोमवारी पहिल्या Festival Month Fashion Sale ची घोषणा केली. ‘फ्लिपकार्ट होलसेल’ हा Flipkart समूहाचा डिजिटल B2B प्लॅटफॉर्म आहे. ऑगस्ट महिन्यापासून या प्लॅटफॉर्मची सुरूवात झाली असून पहिलाच Big Fesitval Month सेल आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार म्हणजे आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे जवळपास महिनाभर हा सेल सुरू असणार आहे.


Flipkart Wholesale  या सेलमध्ये 50 पेक्षा जास्त फॅशन ब्रँडचे प्रोडक्ट्स उपलब्ध असतील, तसेच 100 पेक्षा अधिक विक्रेता आणि 1 लाखापेक्षा जास्त सदस्य या सेलमध्ये सहभागी होतील. या एका महिन्याच्या सेलमध्ये 95 टक्क्यांपेक्षा जास्त लोकल प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. Big Festival Month सेलमध्ये फॅशन कॅटेगरीत मेन्स वेअर, वुमेन्स वेस्टर्न वेअर, वुमेन्स एथनिक वेअर, किड्स वेअर आणि फुटवेअर यांसारख्या श्रेणीत आकर्षक ऑफर्स आहेत. 

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो


फ्लिपकार्ट होलसेलचा व्यवसाय 15 शहरांमध्ये सुरू झाला आहे. या प्लॅटफॉर्ममुळे किराणा आणि एमएसएमईला लाभ होईल असा कंपनीचा दावा आहे. गेल्या वर्षी कंपनीने Flipkart Wholesale या प्लॅटफॉर्मची घोषणा केली होती. “आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता रीटेल आणि एमएसएमई व्यावसायिकांसाठी हा सेल म्हणजे एक शानदार संधी आहे. आम्हाला त्यांची मदत करायची आहे. देशातील किराणा रिटेल इकोसिस्टमला यामुळे बळ मिळेल”, असं फ्लिपकार्ट होलसेल आणि वॉलमार्ट इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रमुख आदर्श मेनन यांनी या सेलबाबत माहिती देताना सांगितलं.