Main Featured

पण नवीन रुग्णांनी वाढवली चिंता! वाचा 24 तासांतील आकडेवारी


latest-coronavirus-numbers-Recovery-rate-increased

latest coronavirus numbers भारतातील कोरोना corona रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून विक्रमी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांतही देशात पुन्हा एकदा 90 हजारहून अधिक रुग्ण सापडले. एकाच दिवसात आज 94 हजार 372 रुग्णांची नोंद झाली. यासह देशातील एकूण रुग्णांची संघ्या आता 47 लाख 54 हजार 356 झाली आहे. तर, 24 तासांत 1114 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात 9 लाख 73 हजार अॅक्टिव्ह रुग्ण Active patient आहेत. तर, आतापर्यंत 37 लाख 2 हजार 596 रुग्ण निरोगी झाले आहेत. एकूण मृतांचा आकडा 78 हजार 586 झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशाता रिकव्हरी रेट वाढता आहे. सध्या देशात 77.87% रुग्ण निरोगी आहेत. तर, सकारात्मकता दर 8.80% आहे.

राज्यांची परिस्थिती



रिकव्हरी रेट वाढता

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दरदिवशी 70 हजार रुग्ण निरोगी होत आहेत. मे महिन्यात देशात 50 हजार निरोगी रुग्ण होते, आता 4 महिन्यात हा आकडा 36 लाख झाला आहे. यात देशातील 5 राज्यांचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे. यात महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. या पाच राज्यांमधून 60% रुग्ण आतापर्यंत निरोगी झाले आहे.

भारत दुसऱ्या क्रमांकावर

Corona virus ने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. सर्वच देशांना याचा मोठा फटका बसला असून अमेरिकेपाठोपाठ भारतात दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण आहेत. भारताचा कोरोना मृत्यूदर हा 1.7% असून अमेरिकेमध्ये तो 3% तर ब्रिटनमध्ये 11.7% आणि इटलीमध्ये 12.6% आहे. भारतात यशस्वीपणे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे भातातील रिकव्हरी रेट चांगला असला तर दिवसाला नवीन वाढणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला 64 लाख (64,68,388) लोक कोरोना विषाणूच्या धोक्यामध्ये होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास 95 हजार दररोज नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत.