Main Featured

कंगनाच्या वक्तव्याचा कोल्हापूर शिवसेनेकडून निषेध


अभिनेत्री कंगना राणावतने (kangana ranaut) मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने त्याचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत.  कोल्हापूर जिल्हा शिवसेनेकडून आज बाचणी (ता.कागल) येथे कंगणाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. 


यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे म्हणाले की, पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या व संपूर्ण भारतीयांच्या भावणा दुखावणारे स्टेटमेंट देणाऱ्या कंगनाचा आम्ही कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने जाहीर निषेध करत आहोत. तसेच यापुढे त्यांनी अशा पध्दतीचे वक्तव्य केल्यास संपूर्ण राज्यात तिचे चित्रपट बंद पाडू शिवाय जशास तसे उत्तर देवू.

यावेळी कागल तालुका प्रमुख अशोकराव पाटील म्हणाले की, कंगनाने भारतात राहून अपशब्द वापरले आहेत हे चुकीचे असून ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही. पाकिस्तानची आपुलकी वाटत असेल, तर त्यांना भारतात राहण्याचा अधिकार काय? असा सवाल यावेळी कंगनाच्या विधानाबाबत त्यांनी केला. 


Must Read

यावेळी कंगना (kangana ranaut) चले जाव, कंगना राणावत मुर्दाबाद अशा निषेधाच्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. यावेळी डॉ. प्रदीप पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख संदीप पाटील, नागेश असते, अमित पाटील, रामदास पाटील, आकाश पाटील, डॉ. के एम पाटील, सुदाम पाटील, शामराव निऊंगरे, विशाल पाटील, सुशांत पाटील, गुरूनाथ डोंगळे, वैभव पाटील, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

बाचणी ता.कागल येथे कंगनाचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध करताना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, तालुकाप्रमुख अशोकराव पाटील, नागेश आसबे, डॅा.प्रदीप पाटील आदी.