Kolhapur News police

Kolhapur News- क्वारंटाईन राहण्याचे आदेश न जुमानता पिठाची गिरण चालविणाऱ्या तरुणावर 5 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. महानगरपालिका व जुना राजवाडा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. फुलेवाडी रिंगरोडवर असणाऱ्या पिठाच्या गिरणीमध्ये हा तरुण मिळून आला. 


जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारण करण्यात आले आहे. महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरु करण्यात आली असून, कंटेन्मेटं झोनमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर 5 हजार रूपये दंडाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. 


हे वाचून बघा....फुलेवाडी रिंगरोडवर पिठाची गिरणी व मिरची कांडप केंद्र चालविणाऱ्या कुटूंबातील तरुण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने इतर सदस्यांना क्वारंटाईन राहण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. परंतु या आदेशाचा भंग करुन या कुटूंबातील 24 वर्षीय तरुण गिरणीमध्ये मिळून आला. त्‍यामुळे जुना राजवाडा पोलिस व महापालिकेकडून त्याच्यावर 5 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. 

शहरात मास्क वापरणे बंधनकारक असतानाही अनेकांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. यामुळे महापालिकेच्या पथकाला आता पोलिसांची मदत (Kolhapur News)मिळत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांसोबत 1 पोलिस कॉन्स्टेबल, 1 शहर वाहतूक शाखेचा पोलिस 2 होमगार्ड असे पथक शहरात दंडात्मक कारवाई करीत आहे.