Main Featured

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर

kolhapur Coronavirus cases

Kolhapur जिल्ह्यात कोरोनाचा (Coronavirus)कहर सुरूच असून, आज 636 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासांत 27 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 30 हजार 670 झाली आहे. दिवसभरात 449 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून, एकूण 19 हजार 325 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 943 वर गेली आहे. मृतांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.


मृतांत शहरातील 8, हातकणंगले 6, करवीर 4, कागल 2, चंदगड 2, गडहिंग्लज, कराड, पन्हाळा, शिरोळ, राधानगरी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असून, यात 22 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. शहरात आज दिवसभरात 166 नवे बाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 668 जणांची कोरोनाची प्राथमिक तपासणी झाली असून, 1 हजार 259 जणांचे आरटी-पीसीआर, सीबीनॅट, तर 775 जणांचे स्वॅब अँटिजेनवर तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.


Must Read


1)कोल्हापूरमध्ये जंम्बो कोविड सेंटरची मागणी

2) कोल्‍हापूर पोलिस भारी केली दंडाची कारवाई

3) आयजीएम रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी लक्ष देणं गरजेचं 4) शहरातील हॉटेल व्यवसायिकांवर पोलिसांची कारवाई 5) कशासाठी, बायकोसाठी ... हौस पूर्ण करण्यासाठी त्याने चोऱल्या दुचाकीKolhapur corona cases updates

हातकणंगले 9, करवीर 3, शहर 4, शिरोळ 7, करवीर 1, कागलमधील 3 जण हातकणंगले तालुक्यात 1 जण बाधित आढळला आहे. दुपारी 4 वाजता शहर 15, राधानगरी 15, कागल 6, करवीर तालुक्यात एक बाधित आढळला आहे. तसेच 4.15 वाजता शिरोळ 6, हातकणंगले तालुक्यात 24 नव्या बाधितांची भर पडली आहे. शहरात 16, करवीर तालुक्यात 5 व हातकणंगलेत एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आला.हातकणंगले तालुक्यात 14, कागल 1, हातकणंगले 1, भुदरगड 1, शहरात 38, जिल्ह्याबाहेरील 8, करवीर तालुक्यात 16 जण बाधित आढळले आहेत. सायंकाळी 5 वाजता करवीर तालुक्यात 11 जणांचा अहवाल बाधित आला आहे. शिरोळ 2, आजरा 1, चंदगड 10, राधानगरी 1, भुदरगड 3, हातकणंगले 3, तर शहरात 5 नवे बाधित आढळून आले आहेत. सायंकाळी 6.30 वाजता शहरात 17, करवीर 3, राधानगरी 1, हातकणंगले 6, पन्हाळा 1, तर गडहिंग्लजमध्ये 13 अशा एकूण 41 बाधितांची भर पडली आहे.

Total corona cases yesterday

करवीर - 46
हातकणंगले -64
कागल -16
शिरोळ- 19