Main Featured

कोल्हापूरात तरुणाचा निर्घृण खून

Kolhapur News crime case

Kolhapur News- शेतात म्हशी जाऊन वैरणीचे नुकसान झाल्याच्या रागातून कुरुकली (ता. करवीर) येथे तरूणाचा धारदार  कोयत्याने वर्मी घाव करून खून करण्यात (crime case) आला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार काशिनाथ उर्फ किशोर साताप्पा पाटील (वय ३०) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. संशयित किरण हिंदुराव पाटील स्वत:हून इस्पुर्ली पोलिस ठाण्यात हजर झाला.


याबाबत घटनास्थळ व पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, गणेश चतुर्थीच्या दिवशी काशिनाथ याच्या कुटूंबातील जनावरे  किरणच्या शेतात गेली होती. त्यावेळी त्यांनी त्यांचे हत्ती गवत खाल्ले असा संशय मारेकरी किरणला होता. त्यामुळे काशीनाथ व किरणमध्ये वाद झाला होता. हा वाद गावातील तंटामुक्त समितीमध्ये मिटवण्याचा प्रयत्न केला होता.

Must Read


कंगनाने शेअर केला बाळासाहेबांचा जुना VIDEO,म्हणाली......


राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच, पुन्हा एकदा सर्वोच्च संख्या


संशयित किरण पाटील इस्पूर्ली पोलिस ठाणेमध्ये हजर झाला. घटनास्थळी मयत काशिनाथचे धडापासून शीर वेगळे झाले होते. या घटनेची करवीर पोलिसांना माहिती मिळताच करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घटनास्थळी दाखल होऊन सर्व पाहणी (crime case)केली. जागेचा पंचनामा करून मृतदहे शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आला.

दरम्यान, करवीरचे पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मयत किशोर पाटील त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. या घटनेमुळे भेगावती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुरूकलीमध्ये संपूर्ण गावात व्यवहार बंद करून बंद पाळण्यात आला.