Main Featured

कोल्हापूरात दुसऱ्या दिवशीही शांतता

Kolhapur News


Kolhapur News- महापौर नीलोफर आजरेकर आणि चेंबर ऑफ कॉमर्स यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला आज दुसर्‍या दिवशीही संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. ज्या धान्य ओळीला नागरिकांची गर्दी असायची तिथे मात्र आज दुसऱ्या दिवशीही (Curfew)शांतता होती. वर्दीळीच्या ठिकाणी शांतता होती.


ग्रीन मर्चंट असोसिएशनने पाठिंबा दिल्यामुळे ही परिस्थिती दिसून आली. तर शेजारी लक्ष्मीपुरी मार्केटमध्ये  फळ विक्रेते आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी मात्र ग्राहकांची वर्दळ दिसून आली. महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनने जनता कर्फ्यू मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे तेथील काही प्रमाणात दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. तर दुकानात खरेदीसाठी ग्राहक दिसत नव्हते. 


Must Read


तसेच महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांकडे मात्र ग्राहकांची गर्दी दिसत होती. अशीच परिस्थिती काही प्रमाणात राजारामपुरी, शाहूपुरी परिसरात होती. रिक्षा व्यवसाय, एसटी बस इतर वाहतूक सुरू असल्यामुळे शहरात (Kolhapur)जनता कर्फ्यू आहे असे वाटत नाही मात्र दुकाने बंद असल्यामुळे नेहमीची गर्दी सुद्धा जाणवत नाही. एकंदरितच जनता कर्फ्यूला (Curfew) संमिश्र प्रतिसाद असल्याचे जाणवते.