Main Featured

कोल्हापूर शहरात १० ठिकाणी मोफत स्वॅब तपासणी

swab test center

Kolhapur- महापालिका प्रशासनाने शहरातील 10 ठिकाणी मोफत स्वॅब तपासणीची (swab test) सुविधा उपलब्ध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे आयसोलेशन, सीपीआर आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथील तपासणी यंत्रणेवरील ताण हलका होणार आहे. 


तसेच संशयित रुग्णांचाही तासन् तास रांगेमध्ये उभा राहण्याचा त्रास कमी होईल. दहा नागरी आरोग्य केंद्रांवर संशयितांसाठी तर पंचगंगा आणि सावित्रिबाई फुले रुग्णालयामध्ये गरोदर महिलांची (pregnant women) स्वॅब तपासणी होईल. तरी संशयित रुग्णांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर तपासणी करावी, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी केले आहे.

Must Read

 मोफत स्वॅब तपासणी केंद

मोफत स्वॅब घेण्यासाठी शहरात निश्चित केलेल्या दहा कुटुंब कल्याण केंद्रामध्ये व फिरंगाई हॉस्पिटल, राजारामपुरी, कसबा बावडा, महाडीक माळ, फुलेवाडी, सदर बाजार, सिध्दार्थनगर, मोरेमाने नगर यांचा समावेश आहे. तर सावित्रीबाई फुले आणि पंचगंगा हॉस्पिटल ही कुंटुब कल्याण केंद्रे केवळ गरोदर महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

स्वॅब तपासणी पूर्णतः मोफत

स्वॅब तपासणीसाठी (swab test) शहरातील कोणत्याही संशयित रुग्णाकडून शुल्क आकारले जाणार नाही. तपासणी पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. सीपीआर आणि आयसोलेशन हॉस्पिटल येथेच मोफत स्वॅबची सुविधा उपलब्ध होती. मात्र वाढत्या रुग्णसंख्येचा आणि शहरवासीयांच्या मागणीचा विचार करता, महापालिकेने सीपीआर, आयसोलेशनसह शहरातील दहा नागरी आरोग्य कुटुंब कल्याण केंद्राच्या ठिकाणी मोफत स्वॅब घेण्याचे नियोजन केले आहे.