Main Featured

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना उद्रेक कायम

corona cases in kolhapurKolhapur- कोरोना (corona)संसर्गाचा जिल्ह्यातील उद्रेक सोमवारीही कायम राहिला आहे. गेल्या 24 तासांत 30 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर 328 नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. 462 व्यक्‍ती कोरोनामुक्‍त झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 35 हजार 626 जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी 23 हजार 206 व्यक्‍तींनी कोरोनावर मात केली आहे. आजतागायत 1,108 बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसभरात कोरोनामुळे चंदगड तालुक्यातील 11 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सोमवारी  रात्री उशिरापर्यंत टप्प्याटप्प्याने 328 जण बाधित आढळले आहेत.
उपचारांची अपुरी यंत्रणा आणि सातत्याने वाढणारी मृत्यू व बाधितांची संख्या, यामुळे आरोग्य प्रशासन खडबडले आहे. दिवसभरात झालेल्या मृत्यूंमध्ये चंदगड 11, हातकणंगले 8, करवीर 5, शहर 3, शाहूवाडी, पन्हाळा, कागल, शिरोळ प्रत्येकी 2, तर आजरा, राधानगरी तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. 

Must Read


कोरोना संसर्ग कोल्हापूर (Kolhapur)शहराबरोबर, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, करवीर, आजरा, भुदरगड तालुक्यात वाढत आहे. सोमवारी 1,443 जणांची कोरोनाची प्राथमिक तपासणी झाली. 1,398 जणांचे आरटी-पीसीआर, सीबीनॅट, तर 389 व्यक्‍तींचे अँटिजेनवर स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

रविवारी रात्री 11.45 वाजता करवीर 15, शहर 33, पन्हाळा तालुक्यात 1 बाधित रुग्ण आढळला आहे. मध्यरात्री 12 वाजता करवीर 6, शाहूवाडी 15, शहर 12, भुदरगड 24, शिरोळ 14, राधानगरी 19, पन्हाळा 27, हातकणंगलेत 5 जणांना कोरोची लागण (corona)झाल्याचा अहवाल प्राप्‍त झाला आहे. सोमवारी सकाळी 9 वाजता शहरात 3, कागल, राधानगरीत प्रत्येकी 1 बाधित आढळून आला. सकाळी 10 वाजता हातकणंगले तालुक्यातील 1 व्यक्‍तीचा कोरोना अहवाल बाधित आला. सायंकाळी 4.30 वाजता 46 जणांचे अहवाल प्राप्‍त झाले आहेत. यामध्ये शहर 32, हातकणंगले 3, करवीर 5, पन्हाळा 1, राधानगरी तालुक्यातील 1 व्यक्‍तीचा समावेश आहे.