kolhapur coronaKolhapur- कोरोनाबाधितांच्या संख्येत (corona)बुधवारी आणखी 584 रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात 21 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 1 हजार 163 इतकी (effect of corona)झाली आहे. बुधवारी 522 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. आजपर्यंत 24 हजार 824  जण कोरोनामुक्‍त झाले आहेत. एकूण बाधितांची संख्या 37 हजार 038  इतकी आहे.
कोल्हापुरात बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 882 अहवाल मिळाले. त्यापैकी 1 हजार 547 निगेटिव्ह तर 352 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. (135 अहवाल प्रलंबित तर 20 अहवाल नाकारण्यात आले), अँटिजेन टेस्टिंग चाचणीचे 440 अहवाल आले. यापैकी 380 निगेटिव्ह  तर 60  पॉझिटिव्ह (135 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये तसेच लॅबमध्ये 307 प्राप्त अहवालापैकी 172 पॉझिटिव्ह आले (effect of corona)आहेत.

Must Read


मंगळवारी रात्री 12 वाजेपासून बुधवारी रात्री 12 पर्यंत आलेल्या  पॉझिटिव्ह अहवालामध्ये आजरा 14, भुदरगड 4, चंदगड 18, गडहिंग्लज 23, गगनबावडा 3, हातकणंगले 5, कागल 47, करवीर 7, पन्हाळा 2, राधानगरी 21, शाहूवाडी 36, शिरोळ 28, नगरपरिषद क्षेत्र 83, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 110 व इतर शहरे व राज्य 37 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजअखेर सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर

महापालिका क्षेत्रात आढळले आहेत. या रुग्णांची संख्या 11 हजार 486 इतकी झाली आहे. आजरा 652, भुदरगड 840, चंदगड 787, गडहिंग्लज 869, गगनबावडा 102, हातकणंगले 4 हजार 174, कागल 1 हजार 279, करवीर 4 हजार 114, पन्हाळा 1 हजार 364, राधानगरी 1 हजार 003, शाहूवाडी 900, शिरोळ 1 हजार 995, नगरपरिषद क्षेत्र 5 हजार 843, इतर जिल्हा व राज्यातील 1 हजार 247  इतकी रुग्णसंख्या आहे.