Main Featured

जिल्ह्यात मृत्यूचा कहर कायम

Kolhapur

Kolhapur- जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या नियंत्रणात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कोरोनाबाधित (coronavirus Infected)मृत्यूचा कहर कायम आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 857 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, शनिवारी तब्बल 630 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले असून, आतापर्यंत 17 हजार 940 जण कोरोनामुक्‍त झाले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात 414 बाधित आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 28 हजार 114 झाली आहे.


कोरोनाबाधित (coronavirus infected)मृतांत 15 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. सीपीआरमध्ये 11, आयजीएममध्ये 1, तर खासगी रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य प्रशासनाकडे आहे. सीपीआर, आयजीएम, कोरोना केअर सेंटरसह खासगी रुग्णालयांत 2 हजार 87 नागरिकांची कोरोनाची तपासणी झाली. त्यामध्ये 1,781 रुग्णांचे आरटी-पीसीआर, सीबीनॅटसाठी, तर 809 संशयितांचे स्वॅब अँटिजेनवर तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.Must Read


शुक्रवारी रात्री 12.30 वाजता 9 कोरोनाबाधित आढळून आले. यात शहरासह करवीर तालुक्यात प्रत्येकी 3, कागल 1, जिल्ह्याबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी सकाळी 9 वाजता हातकणंगले तालुक्यातील तिघांचे बाधित अहवाल प्राप्‍त झाले. 11.30 वाजता 47 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले असून, यामध्ये शाहूवाडीतील 16, तर शहर 14, करवीर 10, राधानगरीत 3, हातकणंगले तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

Kolhapur corona cases-


सायंकाळी 5.15 वाजता 60 बाधितांची भर पडली असून, यात शहरात 18, हातकणंगले 14,  करवीर, राधानगरी प्रत्येकी 19, शिरोळ 7, तर भुदरगडमधील एकाचा समावेश आहे. सायंकाळी 5.30 वाजता पन्हाळ्यात 14 व हातकणंगलेत 10, शिरोळ 11 असे एकूण 35 बाधित आढळले आहेत. रात्री 8 वाजता कागल व गडहिंग्लज तालुक्यातील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. साडेआठ वाजता पन्हाळा 14, शाहूवाडी 8, करवीर 1, तर शहरातील 37 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्‍न झाले. 8.45 वाजता 33 जणांचे अहवाल बाधित आले असून, यामध्ये शहर 20, कागल 10, तर पन्हाळा, चंदगड, करवीरमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. रात्री 9 वाजता 56 जणांचे अहवाल बाधित आले असून, यात कागल 3, हातकणंगले 16, शहरात 10, करवीर 9, राधानगरी 1, शाहूवाडीमधील 1 समावेश आहे. याचवेळी चंदगड 6, शाहूवाडी 5, तर आजरा येथे 9 जणांना संसर्ग झाल्याचे अहवाल प्राप्‍त झाले आहेत. 9.15 वाजता करवीर 24, शहरात 46, भुदरगड 6, हातकणंगले 24, कागल 1, आजरा 1, राधानगरी 3, शाहूवाडी 6, शिरोळ 2, पन्हाळा 2, गगनबावडा 1 तर जिल्ह्याबाहेरील 3 जण आहेत.