kolhapur- जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 21 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, 461 नव्या बाधितांची भर पडली आहे. 788 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 28 हजार 602 झाली आहे.
बाधित रुग्णांची संख्या (corona) 40 हजार 381 एवढी आहे. तर मृतांची एकूण संख्या 1 हजार 297 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, गेले आठवडाभर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. त्याबरोबरच दिवसेंदिवस कोरोनामुक्त रुग्णसंख्याही वाढत आहे. मृतांत शिरोळ व गडहिंग्लज तालुक्यांतील प्रत्येकी 4, शहर 3, पन्हाळा, हातकणंगले, करवीरमधील प्रत्येकी 2, तर राधानगरी, शाहूवाडी, आजरा, चंदगड तालुक्यांतील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश असून, 15 पुरुष व 6 महिला यामध्ये आहेत.
Must Read
1) ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन
2) भाजपाला दणका; मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच
3) WhatsApp च्या उपयुक्त अशा 5 टिप्स अँड ट्रिक्स
4) बेबी डॉल सनी लिओनी पतीसोबत रतेय एन्जॉय
5) लॉकडाउनमध्ये रिलीज झालेल्या या ५ वेबसीरिजचे शूटिंग
kolhapur जिल्ह्यात 1 हजार 294 जणांची कोरोनाची प्राथमिक तपासणी झाली. यामध्ये 1 हजार 417 आरटी-पीसीआर, सीबीनॅटवर तपासणीसाठी घेतले आहेत. तर अँटिजेनवर 452 जणांचे स्वॅब तपासणी झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या घटू लागल्याने वैद्यकीय पथकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सीपीआर रुग्णालयातदेखील स्वॅबची गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे सीपीआर प्रशासनाने रुग्णालय परिसरातील मंडप काढण्यास सुरुवात केली आहे.
रविवारी 1 हजार 141 जणांचे स्वॅब आरटी-पीसीआर, सीबीनॅटवर तपासण्यात आले. त्यामध्ये 924 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, तर 217 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अँटिजेनवर 452 स्वॅब तपासण्यात आले, यात 414 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. तर 38 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
452 पैकी 80 जणांचे स्वॅब पुढील तपासणीसाठी आरटी-पीसीआर, सीबीनॅटवर पाठविले आहेत. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांत घेण्यात आलेल्या 451 स्वॅबपैकी 245 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर 206 जण बाधित आढळले आहेत.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गेली सहा महिने दिवस-रात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटू लागल्याने वैद्यकीय पथकांच्या चेहर्यावर उत्साह दिसत आहे. मात्र, वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावर केव्हाही परिणाम होऊ शकतो.
नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच कोरोनासद़ृश लक्षणे जाणवताच उपचार घ्यावेत, असे आवाहनदेखील आरोग्य विभागाने केले आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेने जिल्ह्यात गती घेतली आहे. त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.