Main Featured

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग

kolhapur corona cases

kolhapur- जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहे. कोरोनाबाधितांच्या दरापेक्षा मृत्यूदर वाढत असल्याने कोल्हापूरकरांसह वैद्यकीय क्षेत्राची चिंता (effect of corona)वाढत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 34 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 828 जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे; तर 1 हजार 67 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून  कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या 24 हजार 282 झाली आहे.


आज 828 बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 36 हजार 454 झाली आहे. तर एकूण मृत्यूसंख्या 1 हजार 142 झाली आहे. मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. सप्टेंबरअखेर कोरोनाच्या  रुग्णसंख्येचा विस्फोट होणार, असा अंदाज वैद्यकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

Must Read
दिवसभरात बाधित रुग्णामध्ये आरोग्य विभागातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळून (effect of corona)आले आहे. गेले पंधरा दिवस चंदगड, शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले, कागल, आजरा तालुक्यात बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ  लागले आहेत.