Main Featured

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप कायम

corona


Kolhapur- जिल्ह्यातील कोरोनाचा (corona)प्रकोप कायम आहे. गेल्या 24 तासांत 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांची एकूण संख्या 1 हजार 47 झाली आहे. दिवसभरात 763 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली (swab test)आहे. तर 670 व्यक्‍तींनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्‍त रुग्णांची संख्या 22 हजार 111 झाली आहे. आजतागायत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 34 हजार 461 वर पोहोचली आहे.


शनिवारी जिल्ह्यात 1 हजार 454 व्यक्‍तींची कोरोनाची प्राथमिक तपासणी झाली. 1 हजार 793 व्यक्‍तींचे स्वॅब (swab test) आरटी-पीसीआर, सीबीनॅट, तर 394 जणांचे स्वॅब अँटिजेनवर तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
शनिवारी झालेल्या 18 मृतांमध्ये 10 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. यात हातकणंगले 5, शाहूवाडी 2, पन्हाळा 2, शिरोळ 2, करवीर 1, कोल्हापूर शहर 1, तर जिल्ह्याबाहेरील 4 जणांचा मृतांत समावेश आहे. शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता 17 नवे बाधित रुग्ण आढळून आले. 

Must Readयात शहरात 15, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण सापडला. शनिवारी दुपारी 12.30 वाजता 31 बाधितांची भर पडली असून, शहरात 15, करवीर 5, हातकणंगले 2, शाहूवाडीत 9 रुग्ण सापडले आहेत. दुपारी 12.45 वाजता 58 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्‍न झाले असून, शिरोळ 45, हातकणंगले 11, अन्य जिल्ह्यातील 2 रुग्णांचा यात समावेश आहे. 1 वाजता करवीर 32, शिरोळ 7, हातकणंगले 2, शहरात 29, आजरा 3, राधानगरी 1, भुदरगड 1, गडहिंग्लज 1, जिल्ह्याबाहेरील 4, पन्हाळा तालुक्यात 6 जण बाधित आढळून आले आहेत. सायंकाळी 4.30 वाजता शिरोळ 6, हातकणंगले 14, पन्हाळा 2, करवीर 35, शहरात 18, आजरा 1, गडहिंग्लज 22, चंदगड 8, कागलमध्ये 1 नव्या बाधित रुग्णाची भर पडली आहे. 

सायंकाळी 5 वाजता शहरात 15, हातकणंगले 7, चंदगड 5, शिरोळ 2, अन्य जिल्ह्यातील 11, पन्हाळा 1, करवीर 3, गडहिंग्लज 1, राधानगरी 1, कागल 2, आजरा तालुक्यातील 1 जण बाधित आढळून आला आहे. सायंकाळी 6 वाजता भुदगरड 1, शहर 3, हातकणंगले 2, करवीर 1, पन्हाळा तालुक्यातील 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे.

सायंकाळी 7.15 वाजता आणखी 16 बाधितांची भर पडली. यात शहरातील 20, करवीर 4, अन्य जिल्हा व हातकणंगले प्रत्येकी 2, तर गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरीत प्रत्येकी 1 बाधित आढळून आला आहे.