Main Featured

भररस्त्यात तरुणीला पेट्रोलने पेटवण्याचा प्रयत्न

kolhapur news-rape case

Kolhapur News- तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संग्रामसिंह दशरथ गुडेकर (वय 24, रा. शिंदेवाडी, ता. पन्हाळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल (rape case)झाला. तरुणास अटक केली असून त्याला वडगाव न्यायालयासमोर उभे केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. 

नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील युवतीशी झालेल्या ओळखीतून प्रेमाचे नाटक करून, लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर संग्रामसिंह गुडेकर याने पन्हाळा येथील लॉजवर शारीरिक संबंध ठेवले. त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढले होते. त्यानंतर तो पीडित युवतीला वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वाघबीळ, वडणगे येथील लॉजवर वारंवार बलात्कार करीत (rape case)होता. 

हे वाचा

2) Kolhapur - नगराध्यक्ष पदावर टांगती तलवारदरम्यान पीडित तरुणीने लग्न कधी करणार असे मोबाईलवरून विचारले असता त्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे सांगून तिच्याशी बोलणे बंद केले होते. दरम्यान, संग्रामसिंह याने मी दिलेल्या वस्तू परत कर असे सांगितले होते. त्या वस्तू परत करण्यास पीडित तरुणी वारणानगर येथे मैत्रिणीसोबत गेली होती.

वारणानगर येथे वस्तू परत कून गावातील युवक महेश फुणे याच्यासोबत ती परत येत असताना संग्रामसिंह याने या तरुणीच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजूबाजूचे लोक जमल्याने संग्रामसिंह तेथून पळून गेला.

तरुणीने घडला प्रकार वडिलांना सांगून वडगाव पोलिसांत युवकाविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी संशयित गुडेकर याच्यावर वडगाव पोलिसांनी अनुसूचित जाती अत्याचार, जीवे मारण्याचा प्रयत्न, बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केले.