Main Featured

सर्वांची तोंडे काळी करून कंगना गेली

Indian Politics News-kangana


Indian Politics News- मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळं शिवसेनेच्या रडारवर आलेली अभिनेत्री कंगना राणावत ही आज मुंबईहून (Mumbai)हिमाचल प्रदेशला रवाना झाली. ती गेल्याची संधी साधत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला आहे.


'.... शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच' या म्हणीचा अर्थ मला आज तंतोतंत कळला आहे. ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली, त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली. आता मारा बोंबा... जय महाराष्ट्र!' असं ट्वीट सरनाईक यांनी केलं आहे.


Must Read


कंगनानं मुंबई व मुंबई पोलिसांचा अपमान केल्यानंतर तिच्याविरोधात आघाडी उघडणाऱ्यांमध्ये खासदार संजय राऊत यांच्यानंतर सरनाईक होते. कंगना मुंबईत आल्यानंतर आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडतील, असा इशारा सरनाईक यांनी दिला होता. त्यावरून कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्या भाजपनं राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवत ठाकरे सरकारवर टीका केली (Indian Politics News)होती.

प्रताप सरनाईक


शिवसेनेनं धमकी दिल्याचा कांगावा कंगनानं केल्यानं केंद्र सरकारनं तिला तत्परतेनं 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरवली होती. त्या सुरक्षेतच ती मुंबईत (Mumbai)परतली. काल ती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटली. त्यानंतर आज ती पुन्हा हिमाचल प्रदेशमधील मनाली येथील आपल्या गावी निघून गेली. तसं ट्वीट तिनं स्वत: केलं आहे. त्यावरून सरनाईक यांनी भाजपवरही हल्लाबोल केला आहे. कंगनाची बाजू घेणाऱ्यांची तोंडे काळी झाली आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.