Main Featured

कंगनाने शेअर केला बाळासाहेबांचा जुना VIDEO,म्हणाली......

kangana ranaut

India  Politics- कोरोनाच्या (coronavirus)या संकटात सध्या राज्यात अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut)विरुद्ध शिवसेना असा वाद पेटला आहे. यात आता कंगनाने आणखी एक ट्वीट केलं आहे. कंगनाने तिच्या ट्विटमधून शिवसेनेला राजकीय प्रश्नही विचारायला सुरुवात केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट करत कंगनाने आघाडी करुन शिवसेनेची एक दिवस काँग्रेस होईल असं म्हणल्याचा हा व्हीडीओ आहे. आज शिवसेनेची परिस्थिती पाहून काय वाटत असेल असा सवाल कंगनाने केला आहे.

याआधीही कंगनाने शिवसेनेविरोधात अनेक ट्विट केले आहेत. बाळासाहेब ठाकरेंना आताची शिवसेना पाहून काय वाटेल असा सवाल तिने यातून विचारला आहे. खरंतर, शिवसेना आणि कंगानामध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे. सातत्याने बॉलिवूडवर निशाणा साधणाऱ्या कंगनाने आता थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. कंगनाने एकामागोमाग एक असे संतप्त ट्वीट (India Politics) केले.
कंगना मुंबईत पोहोचायच्या आधीच मुंबई महापालिकेने तिच्या ऑफिसवर कारवाई केली. कारवाईस सुरुवात झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तान झाली असल्याचा पुनरुच्चार केला. "मी कधी चुकीची नव्हते आणि माझे शत्रू हे वारंवार सिद्ध करत आहेत की मुंबई आता PoK झाली आहे", असं ती म्हणाली.
कंगनाच्या ऑफिसवर तोडकाम करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जेव्हा पोहोचले तेव्हा कंगनाने ही बाबरची सैन्य असल्याचं म्हटलं. "मणिकर्णिका सिनेमाची अयोध्येत घोषणा झाली होती. त्यामुळे हे ऑफिस मला राम मंदिराप्रमाणेच आहे. आज इथं बाबर आले. इतिहास पुन्हा एकदा घडणार आहे. ज्या प्रकारे राम मंदिर पुन्हा बनलं. तसंच हे ऑफिसही परत तयार होणार आहे", असं कंगना म्हणाली.
मुंबईत आल्या आल्याच कंगनाने Video पोस्ट करून आपले इरादे निश्चित केलं. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत "तुमने जो किया अच्छा किया. आज माझं घर तुटलं आहे, उद्या अहंकार तुटेल", असं ती उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली.