Main Featured

Reliance Jio चा स्वस्त रिचार्ज प्लॅन

JIO Recharge Plan

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन (JIO Recharge Plan)आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका स्वस्त प्रीपेड प्लॅनबाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये  1 जीबी डेटासाठी केवळ 3.5 रुपये खर्च करावे लागतात. सविस्तर जाणून घेऊया या प्लॅनबाबत :


फक्त  3.5 रुपयांमध्ये 1 GB डेटा :-
रिलायन्स जिओकडे 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. 84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी इंटरनेट म्हणजेच एकूण 168 जीबी डेटा मिळतो. दिवसाची 2 जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर 64Kbps च्या कमी इंटरनेट स्पीडने डेटा वापरण्यास मिळतो. म्हणजेच 599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना केवळ 3.57 रुपयांमध्ये एक जीबी डेटा वापरण्यास मिळतो. 

Must Read


इंटरनेट डेटाशिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये (JIO Recharge Plan) अनलिमिटेड जिओ टू जिओ कॉलिंग, नॉन-जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिटे, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं. एकप्रकारे जिओचा हा प्लॅन 249 रुपये आणि 444 रुपयांच्या प्लॅनपेक्षाही स्वस्त आहे. कारण 444 रुपयांच्या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. यात एकूण 112 जीबी डेटा मिळतो, पण त्यासाठी साधारण 1 जीबी डेटासाठी 4 रुपये मोजावे लागतात.
एअरटेल, व्होडाफोन-आयडियापेक्षा स्वस्त :-
जिओला टक्कर देणाऱ्या एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडेही या सेगमेंटमध्ये शानदार प्लॅन आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडे अनुक्रमे 598 रुपये आणि 599 रुपयांचा प्लॅन आहे. दोन्ही प्लॅनची व्हॅलिडिटीही 84 दिवस इतकीच आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. म्हणजे एकूण 126 जीबी डेटा मिळतो. याचाच अर्थ युजर्सना 1 जीबी डेटासाठी 4.75 रुपये खर्च करावे लागतात. म्हणजेच डेटा वापरण्यासाठी जिओच्या प्लॅनच्या तुलनेत  एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या युजर्सना जास्त पैसे खर्च करावे लागतात.