Main Featured

जयसिंगपुरात जनता कर्फ्यूबाबत संभ्रम

Jaysingpur janta curfew

Jaysingpur शहरात जनता कर्फ्यूच्या (curfew)निर्णयासाठी बोलावलेल्या ऑनलाईन बैठकीत नगरसेवक सहभागी न झाल्याने जनता कर्फ्यूचा निर्णय अधांतरी राहिला आहे. सलग तीन बैठका रद्द करून चौथी बैठकही रद्द (online meeting)झाल्याने जनता कर्फ्यूबाबत शहरात व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 


शहरात कोरोनाची (corona) वाढती संख्या लक्षात घेता जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत शहरातील व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन याबाबत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. यानंतर जनता कर्फ्यूला विरोध करण्यासाठी शहरातील भाजीपाला विक्रेते आणि हातगाडेधारकांनी पालिकेवर मोर्चा काढून जनता कर्फ्यूला कडाडून विरोध केला. यानंतर पालिकेत प्रशासन अधिकारी आणि नगरसेवकांची ऑनलाईन बैठक (online meeting)घेऊन यात हा निर्णय घेण्यात येणार होता. 


Must Read


नगराध्यक्षांनी तीन वेळा बैठक बोलावूनही त्या रद्द झाल्या. शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत जनता कर्फ्यूबाबत काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी नगराध्यक्षांसह पालिकेचे अधिकारी ऑनलाईन जॉईन झाले. मात्र, नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने बैठक रद्द करण्याची वेळ आली. सलग चौथी बैठकही रद्द करण्याची वेळ आल्याने जनता कर्फ्यूबाबत संभ्रम कायम राहिला आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पालिकेतील राजकारण नागरीकांच्या मुळावर उठत आहे.

राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने कृती करायला हवी. पालिका प्रशासन आणि जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने उपाययोजना राबवल्या जात असताना नगरसेवकांनी शुक्रवारच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने लोकप्रतिनिधींना नागरीकांच्या आरोग्याशी काही देणे-घेणे आहे की नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

शहरात जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत नगरसेवकांमध्येही एकवाक्‍यता नाही. काही नगरसेवकांनी जनता कर्फ्यू लागू न करता अन्य उपाययोजनांचा अंमल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ऑनलाईन बैठकीत यावर चर्चा करून जनता कर्फ्युबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, चौथी बैठकही रद्द झाल्याने पुढे काय, हा प्रश्‍न अनुत्तरित राहिला आहे.