Main Featured

चीनला झटका, ‘ब्लॅक टॉप’ ताब्यात


चीनवर (China)सरशी साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या महत्त्वाच्या टेकडया भारतीय (India)सैन्याने ताब्यात घेतल्या. त्यानंतर आता सामरिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘ब्लॅक टॉप’ जवळचा एक भाग इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या ३० जणांच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचालींवर नजर ठेवणे शक्य होणार आहे.


४,९९४ मीटर उंचीवर असलेल्या फुरचूक ला पासहून ITBP चे जवान आता ‘ब्लॅक टॉप’ जवळचा नव्या ठिकाणी पोहोचले आहेत. ITBP ताब्यात घेतलेला भाग चीन विरोधात रणनितीक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. 
Must Read

पँगाँगच्या उत्तरेला फिंगर दोन आणि तीन जवळ असलेल्या धान सिंह पोस्टपर्यंत ITBP च्या जवानांची आतापर्यंत तैनाती होती. पहिल्यांदाच वर्चस्व मिळवून देणाऱ्या उंचावरील भागात मोठया संख्येने आम्ही उपस्थित आहोत असे ITBP आयजी (ऑपरेशन) एम.एस.रावत म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
हेल्मेट टॉप, ब्लॅक टॉप, यलो बम्पजवळच्या टेकडयांवर भारतीय (India)लष्कर, ITBP आणि स्पेशल फ्रंटियर फोर्स संयुक्तपणे तैनात आहेत. उंचावरचा प्रदेश ताब्यात घेतल्यामुळे इथून चिनी सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होत आहे.