Main Featured

IPL2020:कशी झाली रोहित शर्माची करोना चाचणी Video Viral

IPL 2020- rohit sharma video viral


IPL 2020- आयपीएलसाठी दुबईला(Dubai) गेल्यावर सर्वच खेळाडूंच्या कराना चाचण्या झाल्या. पण खेळाडूंच्या करोना चाचण्या होतात तरी कशा, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai  Indians)कर्णधार आणि त्याच्या संघ सहकाऱ्यांची करोनाची चाचणी कशी होते, याचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला आहे. या व्हिडीओमध्ये खेळाडूंची करोना चाचणी घेताना काय सुरक्षिततेचे उपाय घेतले जातात, पाहा...


आयपीएलमध्ये आतापर्यंत हजारो करोनाच्या चाचण्या (corona test)झाल्या आहेत. या करोनाच्या चाचण्या होतात तरी कशा आणि चाचणी घेणाऱ्या व्यक्ती नक्कीच करतात तरी काय, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता होती. 

पण आतापर्यंत खेळाडूंची करोना चाचणी कशी होते, हे त्यांना पाहता आले नव्हते. पण मुंबई इंडियन्सने (Mumbai  Indians)आपल्या संघातील खेळाडूंची करोना चाचणी कशी केली जाते, याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि टहा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला आहे.


Must Read