Main Featured

IPL 2020 : या तीन युवा फलंदाजांमध्ये शतकी खेळी करण्याची धमक


 ipl 2020, prithvi shaw, riyan parag,shubman gill

आयपीएलच्या 
IPL 13 व्या हंगामातील स्पर्धा युएईच्या मैदानात रंगणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटला ब्रेक लागल्यानंतर भारतीय खेळाडूंसाठी ही पहिली स्पर्धा असेल. आयपीएल स्पर्धा ही राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा मापदंड नसली तरी युवा खेळाडूंसाठी निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण मानली जाते. यंदाच्या स्पर्धेत युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे खास लक्ष असेल. बिनधास्त अंदाजात खेळणारे युवा फलंदाज या हंगामात धावांची बरसात करुन लक्षवेधी खेळी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील. नजर टाकूयात  निडर होऊन खेळण्याची क्षमता असल्यामुळे शतकाला सहज गवसणी घालू शकतील अशा धडाकेबाज फलंदाजांवर..

शुभमन गिल-
 कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात असलेला युवा फलंदाज शुभमन गिलही यंदाच्या स्पर्धेत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. 2018 च्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावरच त्याने कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात स्थान मिळाले. मागील हंगमात त्याने चांगली कामगिरी करुन दाखवत आपली निवड योग्य होती हे सिद्ध करुन दाखवले होते. आतापर्यंत  27 सामन्यात त्याने 499 धावा केल्या आहेत. मागील हंगामात त्याने 45 चेंडूत 76 धावांची जबरदस्त इनिंग खेळली होती. जर त्याला सलामीला संधी मिळाली तर शतकाल गवसणी घालण्याचा पराक्रमही तो दाखवू शकतो.  
 
पृथ्वी शॉ
 दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात करणाऱ्या पृथ्वी शॉमध्येही धडाकेबाज इनिंग खेळण्याची ताकद आहे. मागील हंगामात तो शतकी खेळीच्या जवळ पोहचलाही होता. नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 99 धावांची खेळी केली होती. अवघ्या 55 चेंडूत त्याने 99 धावा केल्या होत्या. एका धावेनं शतकाला हुलकावणी बसल्यानंतर यंदाच्या हंगामात त्याच्या भात्यातून शतकी खेळी निघेल अशी आस आहे. तो शतकी खेळी साकारु शकणाऱ्या फलंदांजाच्या यादीतील खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने  25 सामन्यात 598 धावा केल्या आहेत. .यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

रियान पराग-
राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील रियान पराग हा प्रतिभावंत खेळाडूंपैकी एक आहे. 18 वर्षीय पराग बिनधास्त फटकेबाजीने धावांची बरसात करण्याची क्षमता असणारा फलंदाज आहे. मागील आयपीएलच्या हंगामात त्याने जलद अर्धशतक करुन सर्वांचे लक्ष वेधले होते. या स्पर्धेत जलद अर्धशतक करणारा तो सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला होता.  जर त्याला सातत्यपूर्ण टीम इलेव्हनमध्ये स्थान मिळाले तर तो यंदाच्या हंगामात शतकी खेळी देखील साकारू शकतो.