Main Featured

IPL 2020 : हरभजन सिंहची स्पर्धेतून माघार


                                                                                

चेन्नई सुपरकिंग्जचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह  (Harbhajan Singh) यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार नाहीये. खासगी कारण देऊन हरभजनने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. Sportsstar संकेतस्थळाने यासंदर्भातली बातमी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री हरभजनने (Harbhajan Singh withdraws from competition)चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला आपण यंदाच्या हंगामात खेळू शकणार नसल्याचं कळवलं आहे. सुरुवातीला आईच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी हरभजन दोन आठवडे उशीरा युएईत दाखल होणार होता. १ सप्टेंबरपर्यंत हरभजन सिंह युएईत दाखल होणं अपेक्षित होतं. परंतू ती वेळ निघून गेल्यानंतर हरभजनने माघार घेण्याचं ठरवलंय. चेन्नईचं संघ व्यवस्थापन लवकरच यासंदर्भातली अधिकृत औपचारिक घोषणा करणार आहे.

Must Read


युएईत दाखल झालेल्या चेन्नईच्या संघासमोर गेल्या काही दिवसांमध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या. सर्वात प्रथम दीपक चहर (Deepak Chahar) आणि ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwadया दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली. याचसोबत संघातील १२ सपोर्ट स्टाफचा करोना अहवालही पॉझिटीव्ह आला होता. यानंतर सर्व बाधित व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आलं. या सर्वांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर (Harbhajan Singh withdraws from competition)चेन्नईचा संघ सरावाला सुरुवात करणार आहे. याचसोबत संघाचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनानेही स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात CSK कोणत्या खेळाडूंना संघात स्थान देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.