Mumbai  Indians vs royal challengers bangaloreIPL 2020- इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) सोमवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सशी (Mumbai  Indians)सामोरे जाताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाला वेगवान माऱ्याची प्रमुख चिंता भेडसावते आहे.

बेंगळूरुने यंदाच्या ‘आयपीएल’चा दिमाखदार प्रारंभ के ला. परंतु किं ग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध तारांकित फलंदाजीची फळी कोसळल्यामुळे आणि वेगवान गोलंदाज महागडे ठरल्यामुळे त्यांना ९७ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला.

या दोन सामन्यांत अनुक्र मे १४ आणि १ धावा काढणाऱ्या कर्णधार विराट कोहलीकडून मोठय़ा खेळीची आणि मैदानावर अधिक काळ टिकण्याची अपेक्षा केली जात आहे. ‘आयपीएल’ हंगामाचा दमदार अर्धशतकाने प्रारंभ करणारा युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कलही पंजाबविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरला.

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..


ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार आरोन फिन्चकडूनही सामना जिंकू न देणाऱ्या खेळींची अपेक्षा आहे. एबी डीव्हिलियर्स सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहे. परंतु उत्तरार्धातील फटके बाजीची जबाबदारी त्याने पार पाडायला हवी. पहिल्या दोन सामन्यांत दुखापतीमुळे अष्टपैलू ख्रिस मॉरिस खेळू शकला नाही.

बेंगळूरुच्या गोलंदाजीची भिस्त यजुर्वेद्र चहलवर आहे. वेगवान माऱ्यातील नवदीप सैनी, डेल स्टेन आणि आणि उमेश यादव महागडे ठरत आहेत. स्टेनचे स्थान जरी टिकले तरी यादवऐवजी मोहम्मद सिराजचा पर्याय वापरला जाऊ शकतो. इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीसुद्धा संधीच्या प्रतीक्षेत आहे.

दुसरीकडे, कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या विजयात सर्व आघाडय़ांवर यश मिळाल्याने मुंबई इंडियन्सच्या (Mumbai  Indians) संघरचनेत बदल होण्याची शक्यता कमी आहे. पण सौरभ तिवारीच्या जागी इशन किशनचा समावेश होण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्माला सूर गवसल्याने मुंबईची मुख्य चिंता मिटली आहे. सूर्यकु मार यादवनेही अप्रतिम फलंदाजी के ली. धडाके बाज फलंदाज हार्दिक पंडय़ा आणि किरॉन पोलार्ड आवश्यकतेनुसार गोलंदाजीचा भारही समर्थपणे सांभाळत आहेत.

चेन्नई सुपर किं ग्जविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या जसप्रीत बुमरानेही कोलकाताविरुद्ध समर्थपणे मारा केला. जेम्स पॅटिन्सन आणि किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट त्याला तोलामोलाची साथ देत आहेत.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स  सिलेक्ट १