Main Featured

IPL 2020 : मुंबई इंडियन्सची ‘Smart Ring’ करणार करोनाचा सामना

Mumbai Indians

आयपीएलच्या तेराव्या (IPL 2020) हंगामासाठी सर्व संघ आता युएईत दाखल झाले आहेत. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन बीसीसीआयने यंदा स्पर्धेचं आयोजन युएईत केलं आहे. 


करोनामुळे (coronavirus) निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने खेळाडू व इतर सदस्यांसाठी Bio Security Bubble तयार केलं आहे. चेन्नई संघातील दोन खेळाडूंना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. Must Read

बीसीसीआयने (BCCI) सर्व संघांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी Bluetooth Device दिलेलं आहे. परंतू मुंबई इंडियन्सने (Mumbai Indiansयापुढे जात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणखी एक पाऊल पुढे टाकत Smart Ring नावाचं एक उपकरण आपल्या संघातील खेळाडूंना दिलं आहे.

“ही रिंग तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व महत्वाच्या घटकांची माहिती घेते. तुमच्या शरिराचं तापमान, नाडीचे ठोके, हार्ट रेट अशा सर्व गोष्टींची माहिती या रिंगमधून मिळते. एखाद्या खेळाडूच्या शाररिक हालचालींध्ये काही वेगळेपण जाणवलं किंवा त्याच्यात कोणत्याही प्रकारची लक्षण आढळत असतील तर या रिंगच्या माध्यमातून ते समजायला सोपं जातं. एकदा ही गोष्ट समजल्यानंतर त्या खेळाडूवर स्वतंत्रपणे उपचार केले जाऊ शकतात. NBA च्या स्पर्धांमध्येही अशाच पद्धतीच्या रिंगचा वापर होतो.”

युएईला रवाना होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ रिलायन्सच्या नवी मुंबई येथील कॉर्पोरेट पार्कमध्ये सराव करत होता. या ठिकाणीही मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने पुरेपूर काळजी घेतली होती. इतकच नव्हे तर युएईमध्येही मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indiansटीम मॅनेजमेंटने खेळाडूंसह त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी खास सोय केली आहे. २०१९ साली झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईवर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे यंदा हा संघ कशी खेळी करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.