Main Featured

IPL 2020- “धोनीचं नेतृत्व कोब्रासारखं”

ms dhoni

भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी (ms dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतीय संघाचे यशस्वीरित्या नेतृत्व केले. धोनीने कारकिर्दीत अनेक कल्पक निर्णय घेतले. 


मधल्या फळीतील काही खेळाडूंना सलामीवीर म्हणून संधी देणे, फिरकी गोलंदाजीने डावाची सुरूवात करणे असे काही दमदार निर्णय घेत त्याने आपली कारकिर्द घडवली. IPLमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतानाही त्याने संघाला तीन विजेतेपदं मिळवून दिली. त्यामुळेच अनेक क्रिकेट जाणकारांनी धोनीच्या नेतृत्वकौशल्याचे कौतुक केले. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डीन जोन्स याने धोनीबद्दल वक्तव्य केलं आहे.
Must Read
“महेंद्रसिंग धोनी (ms dhoni) हा शांत स्वभावाचा कर्णधार आहे, पण तो १४ महिने क्रिकेटपासून दूर आहे. चेन्नईमध्ये प्रशिक्षण शिबिरात त्याने आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. त्याने क्वारंटाइन काळात अनेक तरूण खेळाडूंना उत्तमरित्या प्रशिक्षण दिले. 
त्यांना खेळाची शिस्त शिकवली. धोनी हा एखाद्या कोब्रा सापासारखा आहे. तो समोरच्या खेळाडूकडून चूक होण्याची शांतपणे वाट पाहतो आणि चूक झाली की मग कोब्रासारखा पटकन प्रतिस्पर्ध्याला संपवून टाकतो”, असं ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना डीन जोन्स म्हणाला.


“धोनी हा कर्णधार म्हणून खूपच मितभाषी आहे. तो सहसा आपल्या योजना समोरच्या संघाला समजू देत नाही. त्याने संघासाठी आतापर्यंत जे काही केलं आहे, ते चाहते कायम लक्षात ठेवतील. धोनी कायम माझ्या यादीत सर्वोत्तम पाच खेळाडूंमध्येच असेल”, असे जोन्स म्हणाला.